Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर – कदमवाकवस्ती “एक गाव एक शिवजयंती उत्सव” शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 9:34

लोणी काळभोर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील एक गाव एक शिवजयंती मोहिमे अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कवडीपाट टोलनाका ते ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शिवजयंती निमित्त शनिवार फेब्रुवारी रोजी चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा येथील पृथ्वीराजकपूर मेमोरियल हायस्कूल मध्ये होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीचा  बालगट, इयत्ता सहावी ते आठवीचा माध्यमिक गट व नववी ते बारावीचा मोठा गट अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. चित्रकला स्पर्धेत बालगटातील विद्यार्थ्यांना छापील चित्र दिले जाईल, त्यामध्ये त्यांनी रंग भरायचे आहेत.

छत्रपती शिवरायांचे बालपण, छत्रपती शिवरायांचे व्यक्तिचित्र, शिवरायांचे गडकिल्ले, माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे एकत्रित किंवा वैयक्तिक चित्र, रणरागिनी हिरकणी, बाल शिवाजी व सवंगडी, माँसाहेब जिजाऊ व बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी या आठपैकी एका विषयावर माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी चित्र काढायची आहेत.

 

मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा, रायरेश्वराची शपथ, शिवजन्मोत्सव सोहळा, पावनखिंड लढाई प्रसंग, किल्ला कोंढाण्याची चढाई ( गड आला पण सिंह गेला), लाल महाल येथील चकमक प्रसंग, मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज या आठ पैकी एका विषयावर चित्र काढायची आहेत.

वक्तृत्व स्पर्धेत वरील प्रमाणेच वयोगट असून सकाळी ९ ते १२ या दरम्यान वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. बालगटातील विद्यार्थ्यांनी शिवबांचे बालपण,  शिवरायांची पहिली मोहीम, मी शिवबांचा मावळा असतो तर, मी पाहिलेला शिवरायांचा किल्ला या चार विषयांपैकी एका विषयावर तीन मिनिटे बोलायचं आहे.

माध्यमिक गटातील स्पर्धकाला बोलण्यासाठी ४ मिनिटांचा वेळ मिळेल. माध्यमिक व मोठ्या गटातील स्पर्धकांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा, आज शिवाजी महाराज असते तर, माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यापैकी एका विषयावर बोलायचं आहे. मोठ्या गटात प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी ५ मिनिटांची वेळ असेल. मोठा गट व माध्यमिक गटाचे विषय एक सारखेच असणार आहेत.

सकाळी १० ते ११ दरम्यान होणा-या  निबंध स्पर्धेतील बालगटातील विद्यार्थ्यांनी २०० शब्दात माझा शिवबा, माॅसाहेब जिजाऊ, किल्ले रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ, शिवजयंती एक लोकोत्सव या चार पैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी ३५० शब्दात शिवरायांचे आत्मकथन, किल्ले संवर्धन काळाची गरज, असा राजा पुन्हा होणे नाही, आदर्श माता जिजाऊ, शिवबांचा छावा संभाजी यापैकी एका विषयावर निबंधलेखन करायचे आहे. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी ५५० शब्दात निबंध लिहायचा आहे. माध्यमिक व मोठ्या गटासाठी निबंधाचे विषय एक सारखेच असणार आहेत.

रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ८ दरम्यान कवडीपाट टोलनाका ते ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीनंतर  श्रीमंत अंबरनाथ मंदिर येथे रात्री ८ वाजता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक समारंभ संपन्न होणार आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज पुणे दौरा; 'या' कार्यक्रमांना लावणार हजेरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.