मुंबई : दोनच दिवसांपुर्वी मुंबईतील खार परिसरात कोरियन युट्युब ब्लॉगर तरुणीची छेडछाड दोन तरुणांनी केली होती. ही घटना ताजी असतानाच एका ‘डिलिव्हरीबॉय’ने खार परिसरातील महिलेचा पार्सल देताना व्हिडीओ काढत विनयभंग केला. या प्रकारात पोलिसांनी शाहजादे शेख याला कलाम ३५४ व ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहजादे शेख हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. खार परिसरातील एका महिलेने ऑनलाईन ऑर्डर दिली होती. पार्सल घेऊन आरोपी आला. आरोपीने पार्सल देताना महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आरोपीच्या या कृत्याच्या महिलेने विरोध केला. मात्र यानंतर आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याप्रकरणात महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शहजादे शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मी पार्सल घेण्यासाठी गेल्यानंतर डिलिव्हरी बॉयने अचानक व्हिडिओ सुरु केला. मी याला कडाडून विरोध केला. मात्र त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केली. मी लगेच आरडाओरड सुरु केला. त्यामुळे माझा आवाज ऐकून इमारतीचे सुरक्षारक्षक माझ्या मदतीला आले, अशी आपबिती पीडित महिलेने सांगितली.