Pune Crime पुणे : रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकाविणार्या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून 2 दुचाकी, 11 मोबाईल असा 1 लाख 56 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रईस जाकीर शेख (वय 21, रा. बोपोडी), रोहित रणवीरसिंग चिडार (वय 21, रा. जयजवाननगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
येरवडा पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस नाईक अमजद शेख आणि अनिल शिंदे यांना मोबाईल हिसकावणारे दोघे कल्याणीनगरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे यांनी पाठलाग करून अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी 29 एप्रिलला रात्रीच्या सुमारास आगाखान पुलावर फोनवर बोलत असलेल्या मुलाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावल्याची कबुली दिली.
त्याशिवाय रोहित रणवीरसिंग चिडार याच्यासह अल्पवयीनांनी ब्रम्हा सनसिटी वडगाव शेरी व अप्पा बळवंत चौकात मोबाईल चोरल्याची कबुली दिली.