Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगी – हद्दीतील “पृथ्वी ग्रीन एनर्जी” कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी ; जीवितहानी नाही मात्र, लाखो रुपयांचे नुकसान..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 20:09

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी-पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी परिसरात असलेल्या कोकोपिट कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. बुधवारी (ता. ०१) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दीड तासानंतर देखील चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तसेच कदमवाकवस्ती येथील स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- 

 

मिळालेल्या माहितीनुसार किरण धनराज झेंडे व संजय धनराज झेंडे यांची पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी-पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी परिसरात “पृथ्वी ग्रीन एनर्जी” नावाने कोकोपिट व इतर साहित्य तयार करण्याची कंपनी आहे. पुणे शहर परिसरातील नारळ हे या कंपनीत पुणे महानगरपालिकेचे टेम्पो मोफत आणून टाकीत होते. या नारळावर या कंपनीत प्रक्रिया करून काथ्या, पायपुसणी, कोकोपिट, नारळ कीस आदी तयार केले जाते.

बुधवारी दिवसभर कंपनीमध्ये काम सुरु होते. कोकोपीट तयार करणारी मशीन देखील सुरु होती. तापमानात झालेल्या वाढीमुळे मशीनने पेट घेतला व ती आग वाळलेल्या नारळांच्या केसरांपर्यंत पोचली व यामुळे आगीने उग्र रूप धारण केले असण्याची शक्यता आहे. यात आगीमुळे जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

दरम्यान, सदरची घटना समजताच वाघोली येथील व कदमवाकवस्ती येथील हिंदुस्थान पेट्रोल टर्मिनल कंपनीची अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम मोठ्या शर्थीने सुरु आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसून कदमवाकवस्ती तसेच परिसरातील नागरिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान, कदमवाकवस्ती येथील मयूर कदम, अक्षय कामठे, व प्रथमेश काळभोर यांनी टँकरने पाणीपुरवठा केला. तसेच सदर ठिकाणी कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या माधुरी काळभोर, चंद्रदीप काळभोर, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, शिक्षक नेते राजेश काळभोर, विशाल चौधरीसह आदींनी सदर ठिकाणी मदत केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

भारताच्या विकासामध्ये वैज्ञानिकांचे योगदान मोठे - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.