Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिस ठाण्याचे ‘स्टाईल आयकॉन’ पोलिस हवालदार संदीप कदम यांचे उपचारादरम्यान अखेर निधन , अंत्यसंस्कार लासुर्णे (ता. इंदापुर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता वाजता होणार.

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 September 2023, 14:16

विशाल कदम.
लोणी काळभोर (पुणे) : बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेकसमोर शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेपाच वाजनेच्या सुमारास झालेल्या अपघातातील, जखमी पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय 43, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता. इंदापूर) यांचे उपचारादरम्यान अखेर सोमवारी (ता. २५) दुपारी निधन झाले. संदीप कदम यांच्यावर अंत्यसंस्कार लासुर्णे (ता. इंदापुर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता वाजता होणार आहेत.

संदीप कदम हे जिल्हा (ग्रामिण) पोलिस दलातील यवत पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षापासुन कार्यरत होते. संदीप कदम पायी जात असताना, पाठीमागुन आलेल्या एका तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये कदम हे गंभीररित्या जखमी झाले होते. संदीप कदम यांना दोन दिवस पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तर काल (रविवार) दुपार पासुन त्यांच्यावर बारामती शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (सोमवारी) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

इंदापुर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवाशी असलेल्या संदीप कदम यांनी बारामती शहर, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लोणी काळभोर पोलिस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावलेले आहे. मागील तीन वर्षांपासून संदीप कदम हे यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलिस चौकीत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. संदीप कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणीसह एक मुलगा व एक मुलगी असा परीवा्र आहे.

 

पोलिस दलातील ‘स्टाईल आयकॉन’ हरपला..

दरम्यान संदीप कदम यांना व्यायामाबरोबरच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सेल्फी व फोटो काढण्याचा मोठा छंद होता. संदीप कदम यांचे फेसबुक अकाउंट पाहिल्यास त्यांच्या छंदाचा अंदाज येतो. पोलिस दलातील आपल्या सहकाऱ्यांबरोबरच संदीप कदम यांनी आपल्या मुला-मुलीबरोबरचे अनेक फोटो फेसबुकवर शेअर केल्याचे दिसून येते. तसेच पोलिस दलातील त्यांची कामगिरी पाहता ते ‘स्टाईल आयकॉन’ असल्याचाच अनुभव येतो. संदीप कदम यांच्या मृत्युती खबर मिळताच, पोलिस दलातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Bhor News : डॉ. आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला विरोध; सांगलीच्या दीडशे कुटुंबांनी सोडलं गाव; लाँग मार्च भोरमध्ये दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.