Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : कदमवाकवस्तीत पालघनासह 19 वर्षीय तरुण अटकेत

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 March 2026, 13:00
Loni kalbhor

photo- social media

loni kalbhor : शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोखंडी पालघन बाळगणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एंजल स्कूलच्या मागील मोकळ्या मैदानात बुधवारी (ता.25) मध्यरात्रीच्या सुमारास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

करण दत्तात्रय पवार (वय 19, रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखा, युनिट-06 चे पोलीस हवालदार प्रशांत दिलीप कर्णवर यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या आदेशानुसार कर्णवर, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर आणि गणेश माने हे अधिकारी 25 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पथक एंजल स्कूलच्या मागील मैदानाजवळ पोहोचले असता एक युवक संशयास्पद हालचाली करत दगडांमध्ये काहीतरी लपवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून पकडले.

चौकशीत त्याने आपले नाव करण दत्तात्रय पवार (वय 19, रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) असे सांगितले. त्याच्या पायाखाली दगडांमध्ये लपवलेली वस्तू काढून पाहिली असता ती एक धारदार लोखंडी पालघन असल्याचे आढळले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत त्याची झडती घेतली असता 35 इंच लांबीचे हे शस्त्र त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले.पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने हे पालघन मित्र राहुल काळे याच्याकडून आणल्याचे सांगितले.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 17 मार्च ते 30 मार्च दरम्यान कोणतेही शस्त्र बाळगण्यास बंदी असताना आरोपीकडे हे शस्त्र आढळल्याने त्याच्यावर गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान जप्त केलेले पालघन पंचनामा करून सीलबंद करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया ई-साक्ष अॅपद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आली आहे. या प्रकरणी करण पवार याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50

गॅस एजन्सीवर तुफान राडा! ई-केवायसीसाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांचा संयम सुटला; दगडफेकीत महिला जखमी

Wednesday, 1 April 2026, 13:33
Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : “यावेळी वाचलास, पुढच्या वेळी बघतोच” असे म्हणून शेतकऱ्यावर दगड व ठोंब्याने हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.