पुणे – बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोटर सायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम लुटली. तसेच त्या विद्यार्थ्यांला आडबाजूला नेहुन त्याला नग्न करून त्याचे नग्नावस्थेत चित्रीकरण केले.
ही घटना रविवारी (ता.४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी विद्यार्थी एमबीबीएस च्या दृतीय वर्षात शिकणारा आहे. विद्यार्थी बारामतीमधील एका मॉलमधून खरेदी करून मेडिकल कॉलेजच्या होस्टेल कडे जात असताना अज्ञात इसमानी विद्यार्थ्यांला वाटेत थांबवले आणि त्याच्या खिशातून बळजबरीने 15 हजार रक्कम काढून घेतली.
दरम्यान, फिर्यादी विद्यार्थ्याला गाडीवर बसून उसाच्या शेतात नेले आणि त्याला मारहाण केली. तसेच त्याला नग्न करून चित्रीकरण केले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांने धाव बारामती तालुका पोलीस ठाण्यात घेतली आणि अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दिली. बा रामती तालुका पोलिसांनी भां द वी 394, 397, 504, 506 कलम अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे