पुणे: गेल्या काही (Pune Weather) दिवसांपासून पुणेकरांना हुडहुडी भरवणारा थंडीचा कडाका आता पूर्णपणे ओसरला आहे. आज सकाळी पुण्यात हलके धुके पाहायला मिळाले असले, तरी दिवसा उन्हाचा चटका चांगलाच जाणवणार आहे. जानेवारी महिना संपत असतानाच पुण्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज पुण्याचे किमान तापमान १९°C ते २०°C च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे, तर कमाल तापमान ३१°C ते ३२°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळे बाष्पयुक्त वारे वाहत असून, त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. थंडी अचानक कमी झाल्याने आणि दिवसा उन्हाचा कडा वाढल्याने हवेत एक प्रकारचा उकाडा जाणवत आहे. या ‘मिश्र’ हवामानाचा परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







