Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माऊली गव्हाणेचा दुसरा खुनीही पोलिसांच्या ताब्यात ; तब्बल दहा दिवसानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 17 March 2025, 18:30

शिरूर, ता. 17 : पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील एका आरोपीला दाणेवाडी येथून रविवारी (ता.  16) रात्री अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज सोमवारी (ता.17) ताब्यात घेतले आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सागर दादाभाऊ गव्हाणे (वय- 20 वर्ष, रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. दोन्ही आरोपींचे समलैंगिक संबंध माऊली गव्हाणे यास माहिती झाले होते. त्यातूनच समलैंगिक जोडप्याने माऊली गव्हाणे यांची निर्घृण हत्या केली आहे. अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली असून, नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर अहिल्यानगर पोलिसांकडून अद्यापही तपास संपलेला नाही. असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे व त्याचा साथीदार एक अल्पवयीन मुलगा या दोघांचे मागील अनेक दिवसांपासून समलैंगिक संबंध होते. त्यांच्या संबंधाबाबत माऊली गव्हाणे याला माहिती होती. तसेच माऊली गव्हाणे ही माहिती बाहेर कोठे तरी सांगेल? याची भिती त्या समलैंगिक जोडप्याला झाली होती. त्यामुळे त्यांनी माऊलीचा काटा काढण्याचे ठरवले होते.

दरम्यान, समलैंगिक जोडपे सागर गव्हाणे व अल्पवयीन साथीदार यांनी गुरुवारी ( ता. 6 मार्च) दुपारी साडेचार वाजता माऊलीशी चर्चा करण्याचे नाटक केले व त्यानंतर संबंधित विषय रात्री बसून मिटवून टाकू असे सांगितले. यावेळी आरोपींनी अतिशय शिताफीने व सराईत गुन्हेगार असल्यासारखे माऊलीला सांगितले की, आम्ही तुला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू, त्यानंतर तो सिग्नल समजून तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये, त्यानुसार टॉर्चचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे साडेअकरा वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला.

 

त्यानंतर सागर व त्याचा अल्पवयीन समलैंगिक साथीदार यांनी माऊलीला दाणेवाडी येथील परिसरात झुडपामध्ये नेऊन एका गमजाने आगोदर फाशी दिली. व त्यानंतर येथील परिसरातील गोपाळवाडी येथील एका बंद खोलीमध्ये नेऊन इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने दोन्ही हात, शीर, पाय धडावेगळे केले आणि आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी शीर, एक पाय आणि दोन हात व धड हे अवयव घोड नदीच्या बाजूला असलेल्या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये पोत्यात दगड भरून फेकून दिले.

आरोपींनी गुन्हा अतिशय चतुराईने व शिताफीने घडवून आणला. तसेच गुन्ह्यातील गुंताही वाढत चालला होता. त्यामुळे खूनाचा छडा लावण्याचे आव्हान अहिल्यानगर पोलिसांपुढे होते. मात्र, अहिल्यानगराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सर्व यंत्रणा कामाला लावून गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून खूनाचा छडा लावण्यास यश मिळविले आहे. खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार..

माऊली गव्हाणे यांचा खून झाल्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी  10  दिवस उलटून गेले होते. त्यामुळे जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. असा आक्रमक पवित्र माऊली गव्हाणे याच्या नातेवाईकांनी घेतला होता. अहिल्यानगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सागर गव्हाणे याला रविवारी (ता. 16) रात्री उशिरा पकडले होते. त्यानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर दाणेवाडी येथील स्मशानभूमीत आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, माऊलीचा अंत्यसंस्कार हा सागर गव्हाणे याच्या घरासमोर करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी संतप्त होऊन सांगितले होते. परंतू,पोलिसांनी मध्यस्ती करून नातेवाईकांची समजूत घातली.  त्यानंतर माऊलीचा अंत्यसंस्कार दाणेवाडी येथील घोडनदी तीरावर करण्यात आला.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Monday, 7 September 2026, 12:26

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Monday, 7 September 2026, 12:14
Next Post

17 वर्षांच्या मुलाकडून देशी बनावटीचे 50,000 किमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे केली जप्त, पुणे येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp