Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News | ‘द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे’ गुळपोळीसह परिसरातील शेतकऱ्यांची स्थिती ; शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे….!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 11:03

हनुमंत चिकणे 

Solapur News | बार्शी, (सोलापुर) : हवामानाच्या अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व अवकाळी पाउस व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे दर कोसळले असून, ‘द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे’ अशी म्हणण्याची वेळ गुळपोळी, मालवंडी, सुर्डीसह मानेगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची ‘पोती’ ओळखल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

गुळपोळीसह मालवंडी, सुर्डी, मानेगाव परिसरात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष दरात प्रचंड घसरण झाली आहे. दहा वर्षांपूर्वी मिळणारे दर आता मिळत असल्याचे अभूतपूर्व चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.

 

यंदा द्राक्षाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे द्राक्षासाठी उत्पादन खर्चही निघेना, अशी परिस्थिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

यंदा द्राक्षाला किमान चाळीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत भाव मिळेल, दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सध्या द्राक्षाला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकर्‍यांनी प्रचंड खर्च करून द्राक्षाचे उत्पादन घेतले. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला भाव मिळत होता. मात्र, मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या अवकाळीनंतर दरात प्रचंड घसरण झाली. द्राक्षासाठी केलेला खर्च वसूल करणेही अवघड झाले असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी नागेश बारवकर व भागवत चिकणे यांनी सांगितले.

 

यंदा द्राक्षबागांना रोगाचा फारसा फटका बसला नाही, त्यामुळे चांगले उत्पादन झाले. द्राक्षाच्या माणिकचमन, एस. एस. जम्बो, आर. के. या वाणाचे द्राक्षांची किंमत हि एकच असल्याने कोणत्याच द्राक्षाला दर नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे द्राक्षाला ही आता बुरे दिन आले आहेत. एकाच टप्प्यात तोडणीस आल्याने व इतर ठिकाणची द्राक्ष बाजारात दाखल झाल्याने दरात कमालीची घट झाली असल्याचे प्रविण चिकणे व योगेश चिकणे यांनी संगितले.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे अवेळी पावसाचे द्राक्ष उत्पादकांना ग्रहण लागले आहे. अवकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्यास शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे कमी दराने विकावी लागणार असल्याचे धनाजी मचाले व गणेश म्हेत्रे यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे..!

पातळीवर व्यापार्‍याला जो एजंट बागा दाखवतो त्याला किलोला एक रुपया कमिशन दिले जाते. जो व्यवहारात मध्यस्थी करून व्यापाऱ्याला द्राक्षाचे फोटो पाठवितो त्याला किलोला दोन-तीन रुपये कमिशन दिले जाते. मात्र हा सर्व बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यावरच आहे. यात गाव पातळीवरील एजंट मालामाल झाले आहेत, ते अनेक सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत.

याबाबत बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील बागायतदार शिरीष चिकणे म्हणाले, “सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. या संकटातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. खते औषधांचे वाढलेले दर वाढलेली मजुरी, हप्ते यांचा मेळ ही बसू शकत नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Arrested | दुकाने फोडून शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Ambegaon Crime | अफुची शेती करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ; २ लाखांचा मुद्देमाल जप्त, घोडेगाव पोलिसांची आठ दिवसात सलग दुसरी कारवाई..!

शेतकऱ्याची विवशता आणि अफूची शेती ; राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

RTE Admission : 'आरटीई'च्या १५ हजार जागांसाठी 'एवढे' हजार अर्ज...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.