Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News: हळद लागण्यापूर्वीच नियतीने डाव साधला! रिसॉर्टवर वधूचा करुण अंत; सलग दुसऱ्या घटनेने गाव हादरलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 December 2025, 10:39
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

 Nashik News: नाशिक: नाशिकमधील (Nashik ) एका आलिशान रिसॉर्टमध्ये सुरू असलेला लग्नसोहळा क्षणात शोकांतिकेत बदलला. ज्या ठिकाणी लग्नाची तयारी, पाहुण्यांची गर्दी आणि आनंदाचे वातावरण होते, त्याच ठिकाणी हळदीच्या दिवशी 29 वर्षीय वधूचा अचानक (Bride death at resort) मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबासह वऱ्हाडी मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा दोन लाख रेशन कार्ड्स रद्द, जानेवारीपासून ‘हे’ धान्य मिळणंही कठीण; पाहा नवा नियम

मृत वधूचे नाव दीपशीखा गिरीश गोडबोले असे आहे. त्या मुंबईतील दादर-माटुंगा परिसरात रुपारेल कॉलेजजवळ वास्तव्यास होत्या. दीपशीखा यांचा विवाह नाशिकजवळील गंगापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये ठरला होता. यासाठी गोडबोले कुटुंबीय आणि नातेवाईक काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये दाखल झाले होते. शनिवारी रात्री संगीत सोहळा उत्साहात पार पडला होता. दीपशीखा यांच्या हातावर मेहंदीही काढण्यात आली होती आणि रविवारी सकाळी लग्नाचे विधी पार पडणार होते.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रिसॉर्टमधील खोली क्रमांक 201 मध्ये नातेवाईकांसोबत असताना दीपशीखा यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. उपस्थित नातेवाईकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना त्वरित श्रीगुरुजी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तयारीदरम्यान दीपशीखा यांना थोडी अस्वस्थता जाणवत होती. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची धावपळ आणि दगदग यामुळे असेल, असा अंदाज बांधून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुर्दैवाने हीच अस्वस्थता त्यांच्या जीवावर बेतली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विशेष म्हणजे याच रिसॉर्टमध्ये अवघ्या आठवडाभरापूर्वी एका वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा याच ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

तडीपार गुंडाचा दोन महिने शहरात मुक्काम अन् महिलेवर केला बलात्कार; पोलिसांच्या नाकावर टिच्चून नराधमाचा हैदोस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.