Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Malegaon Municipal Corporation election: मतदानाच्या काही तास आधी MIM उमेदवारावर जीवघेणा हल्ला; गाडीच्या काचा फोडल्या, राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 January 2026, 13:00
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

 Malegaon Municipal Corporation election: मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation election) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना एक खळबळजनक घटना घडली आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी एमआयएमच्या (MIM) उमेदवारावर हल्ला झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 

मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधून एमआयएमकडून निवडणूक लढवणारे उमेदवार विशाल आहिरे यांच्यावर रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत विशाल आहिरे यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आहिरे हे आपल्या पोलिंग एजंट्सची बैठक आटोपून घरी परतत होते. त्याच वेळी मुंबई–आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच हल्लेखोरांनी दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. हल्लेखोरांनी थेट उमेदवारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र प्रसंगावधान राखत विशाल आहिरे यांनी आपले वाहन वेगाने सायनेगावच्या दिशेने वळवले आणि घटनास्थळावरून निघून गेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मतदानाला अवघ्ये काही तास उरले असताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Next Post
Crime

Crime : फुटलेला मोबाईल अन् विखुरलेल्या चपला... मारेकऱ्यांशी झाली होती मोठी झटापट! माजी सरपंच पुत्राची तीक्ष्ण हत्यारानं हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.