लातूर: लातूर जिल्ह्यात घडलेली एक (Latur Crime) धक्कादायक घटना सध्या (Latur News) चर्चेत आली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चुकीच्या गोष्टींचा प्रभाव वाढत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. लातूर शहराजवळील एका सरकारी शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अश्लील व्हिडिओ पाहून आपल्या वर्गमित्रासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शिक्षक आणि पालक दोघेही हादरले आहेत.

शाळेतील शिक्षकांनी चौकशी केली असता, त्या विद्यार्थ्याने मोबाईलवर पाहिलेल्या व्हिडिओचा परिणाम म्हणून हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यामुळे मोबाईलमुळे मुलांवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शिक्षकांनी सांगितले की, सात-आठ वर्षांच्या मुलांकडून असे प्रकार होणे अत्यंत चिंताजनक आहे आणि यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे पालकांचे दुर्लक्ष.
अनेक पालक आपल्या कामात व्यस्त असतात आणि मुलांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्याच हातात मोबाईल देतात. पण मुलं त्या मोबाईलवर काय पाहतात, कोणत्या गोष्टींचा प्रभाव घेतात, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. सोशल मीडियावर अनेक शैक्षणिक आणि चांगले व्हिडिओ असले तरी, त्याचबरोबर अश्लील आणि चुकीचे कंटेंटही सहज उपलब्ध आहे. लहान मुलांना त्याचे आकर्षण वाटून ते त्याचे अनुकरण करतात, ज्यामुळे असे प्रकार घडत आहेत.
शिक्षकांनी याबाबत पालकांना इशारा दिला आहे की, मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. मोबाईलचा वापर मर्यादित आणि पालकांच्या देखरेखीखाली असावा. अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम पुढे दिसू शकतात. या घटनेमुळे पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे, अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेली ही पिढी भविष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देईल, अशी चिंता शिक्षकांनी व्यक्त केली आहे.







