Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: ज्याला सोपवली सांभाळायची जबाबदारी, तोच बनला वासनेचा भुकेला; 4 सख्ख्या बहिणींवर नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 19 September 2025, 11:42

अहिल्यानगर: अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नातेवाईकानेच एकाच कुटुंबातील चार बहिणींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील विभक्त झाल्यामुळे या चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती. मात्र, मुलींचे रक्षण करण्याऐवजी नराधम तरुणींवर अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलींपैकी एक मुलगी सज्ञान असून, उर्वरित तीन मुली 16, 14 आणि 10 वर्षांच्या अल्पवयीन आहेत.

या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेली सर्वात मोठी मुलगी आपल्या बहिणींना भेटण्यासाठी आल्यावर, आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. दोघांनीही तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला आणि मदत मागितली.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने पावले उचलत चारही पीडित मुलींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. पोलिसांच्या तपासणीत आरोपीने केवळ सज्ञान मुलीवरच नव्हे, तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही अनेकदा अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गंभीर गुन्ह्याला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून जोर धरत आहे. पोलिसांनी आरोपी दांपत्याला अटक केली असून, आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

Shirur News: शिरूरमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून तरुणाला घातला 10 लाखांचा गंडा; पैशांची मागणी करताच दिली जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.