बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील (Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Massajog) यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या (Dhananjay Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 24 नोव्हेंबर 20 करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी (Walmik Karad) एसआयटीसोबतच निवृत्त न्यायाधीश तहलियानी 25 रोजी आपला चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. (Beed News)

या अहवालात घटनेत जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तपशील नमूद करण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या चौकशी समितीने काढलेल्या निष्कर्षांची छाननी करून त्यावर पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे मसुदा सादर करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.
या नव्या समितीमध्ये गृह विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था, गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट, गृह विभागाचे उपसचिव विधी यांचा समावेश आहे. गृह विभागाचे उपसचिव हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड येथील मकोका न्यायालयात सुरू असून मागील सुनावणीवेळी दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.





