Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: बाहेर काय चाललंय पाहायला गेला अन् मृत्यूच्या दाढेत अडकला; शेजाऱ्यांच्या रागाचा बळी ठरला तरुण!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 10:58
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Crime News: नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यंकटी चांदू वाघमारे असे मृत तरुणाचे नाव असून, तो अर्धापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागात राहत होता. (Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 7.30 ते 8.00 वाजण्याच्या दरम्यान घडली. त्या वेळी व्यंकटी आपल्या घरी जेवण करत होता. दरम्यान, घराबाहेर काही लोकांमध्ये वाद सुरू असल्याचा आवाज त्याला ऐकू आला. ‘आमच्या घरावर दगड का फेकले?’ या कारणावरून हा वाद सुरू होता. हा वाद वाढत असल्याचे पाहून व्यंकटी भांडण थांबवण्यासाठी आणि दोन्ही बाजूंना समजावण्यासाठी बाहेर गेला.

तरुणावर हल्ला

मात्र, संशयित आरोपींनी संगनमत करून व्यंकटीवरच हल्ला केला. आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी जोरात मारहाण केली. त्यानंतर त्याचे डोके रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकावर आपटले. या गंभीर मारहाणीमुळे व्यंकटी गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गुन्हा दाखल 

या प्रकरणी व्यंकटीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधू तांदुळकर, गणेश तांदुळकर, मारुती तांदुळकर आणि लता तांदुळकर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच व्यंकटीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. काही संतप्त नातेवाइकांनी आरोपींच्या घरावर हल्ला करण्याचा आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील काही दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12
Next Post
Crime

Crime : गेट-टुगेदर पार्टीत गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार; दोन सख्ख्या भावांचं घृणास्पद कृत्य!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.