Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: हृदयद्रावक! “दुसरं लग्न करू दे नाहीतर…” बीडमध्ये सुनेवर अतोनात छळ अन् शेवट; वंशाच्या हव्यासाने एका माऊलीचा बळी घेतला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 March 2026, 18:11
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Crime News: बीड : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेला छळ सहन करावा लागल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात समोर आली आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून म्हाळसापूर येथील भक्ती अमोल कोरडे या विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू असताना अखेर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

माहितीनुसार, भक्ती कोरडे हिचा विवाह म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. त्यांच्या संसारात तीन मुलींचा जन्म झाला. मात्र मुलगा नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप आहे. पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे हे मागील अडीच वर्षांपासून तिला मुलगा होत नसल्याचे कारण देत त्रास देत होते, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.

इतकेच नव्हे तर पतीला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी द्यावी, असा दबावही तिच्यावर टाकला जात होता. दुसऱ्या लग्नासाठी संमती देऊन तसे लिखित स्वरूपात देण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे. या कारणावरून तिच्यावर वारंवार मारहाण आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून भक्ती कोरडे यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, मात्र महिनाभराच्या उपचारानंतर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी भक्तीच्या आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

Crime News: कीर्तनातील वक्तव्यावरून वाद; छत्रपती संभाजीनगरमध्ये कीर्तनकारावर हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.