Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाकी डागाळली! 58 वर्षीय PSI कडून तरुणीवर वर्षभर अत्याचार; हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवायला गेली अन्… 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 20 February 2026, 11:13

छत्रपती संभाजीनगर: शहरातून संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या 23 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, 58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

 

या प्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, त्याची पत्नी आणि मुलावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची नांदेडची असून ती पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करते. 7 मार्च 2025 रोजी तिचा मोबाईल हरवल्याने ती तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे तिची भेट पीएसआय सुभाष चव्हाण याच्याशी झाली. तक्रार नोंदवण्याच्या बहाण्याने चव्हाणने तिचा नंबर मिळवला आणि ‘नंबर कन्फर्म करायचा आहे’ असे सांगून तिला फोन करण्यास सुरुवात केली.

हळूहळू त्याने मदतीचा बहाणा करून तरुणीचा विश्वास संपादन केला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा आरोप आहे की, चव्हाणने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नाही तर, तिला बनावट मंगळसूत्र बांधून ‘तू माझी पत्नी आहेस’ असे भासवले.

तीन वेळा सक्तीने गर्भपात

तक्रारीनुसार, 7 मार्च 2025 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा अत्याचाराचा सिलसिला सुरू होता. या दरम्यान पीडिता गर्भवती राहिली असता, तिची इच्छा नसतानाही आरोपीने पुणे आणि संभाजीनगर येथे तिचा तीन वेळा गर्भपात घडवून आणला. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

कुटुंबियांकडूनही मारहाण आणि धमकी

या संपूर्ण प्रकरणाची माहिती आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांना मिळताच, त्यांनीही पीडितेला धमकावण्यास सुरुवात केली. 28 जानेवारी रोजी आरोपीच्या पत्नीने पीडितेला “माझ्या पतीचा पाठलाग सोड आणि गर्भपात कर” असे म्हणत मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत आणि मुलाने केलेल्या मारहाणीत पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शारीरिक आणि मानसिक छळाची परिसीमा गाठल्यानंतर पीडितेने अखेर हिंमत एकवटून पोलिसांत धाव घेतली. या गंभीर तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पीएसआय सुभाष चव्हाण, त्याची पत्नी आणि मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Loni kalbhor News: दोन वर्षांच्या चिमुकल्यासमोर मजुराची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप गूढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.