Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Bodies Election: महापालिका निवडणुकीचा ‘डिसेंबर’ मुहूर्त टळला! आता २२ डिसेंबरला अंतिम यादी; आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्याचं लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 22:42
Local Bodies Election: Municipal elections postponed to December! Final list on December 22; State eyes on Supreme Court verdict on reservation

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies Election) निवडणुकांतील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मर्यादा या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज (Maharashtra Election) महत्वाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी एका बाजूने करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूने 50 टक्के मर्यादा पाळण्याचा आग्रह धरण्यात आला. आरक्षणाचा कोटा ओलांडला असल्यास त्याची संपूर्ण यादी सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले. आयोगाने कोर्टात सांगितले की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सध्या जाहीर होणार नाही. मात्र आधी जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही आणि अंतिम निर्णय पुढील सुनावणीत घेण्यात येईल. (Breaking News)

 

राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि मतदानासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले असून डिसेंबर महिन्याच्या मध्यात या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आजच्या सुनावणीनंतर परिस्थिती बदललेली दिसत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता कमी झाली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती चालवल्या जात आहेत. 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्या प्रशासकांकडून चालवल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश पूर्वी दिले होते. कोर्टाने आज म्हटले की एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची तयारी आहे. निवडणुका वेळेत होणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या दुरुस्तीचा बदललेला कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार याद्यांवरील प्रक्रिया 12 डिसेंबरऐवजी 22 डिसेंबरला पूर्ण होईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार असून कोर्टाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
Breaking News: Big relief for flood-affected farmers in the state! One-year moratorium on recovery of agricultural loans; Government also orders restructuring...

Breaking News: राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेती कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती; सरकारने पुनर्गठनाचेही दिले आदेश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.