मुंबई: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. मतदार संघ भाजपलाच सुटणार असल्याचं भाजपकडून म्हणण्यात येत आहे. दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसात घेईल. मेरिटनुसार आणि सर्वेनुसार भाजपचाच उमेदवार देण्यात येईल. महायुतीचे घटक पक्ष आम्हाला नक्की मदत करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वे भाजपच्याच बाजूने आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बूथनिहाय भाजप आघाडीवर आहे, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.