Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Grampanchayat Election: महाराष्ट्र शासनचा मोठा निर्णय!14 हजार ग्रामपंचायतींवर सरपंचच राहणार प्रशासक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 9:44

Grampanchayat Election: मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 मध्ये (Gram Panchayat Term Ends) मुदत संपणाऱ्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आता बाहेरील अधिकारी नेमले जाणार नाहीत. त्याऐवजी त्या त्या गावातील विद्यमान सरपंचांनाच प्रशासक (Sarpanch Administrator Decision 2026) म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गावातील प्रशासनात सातत्य राहणार असून विकासकामे थांबण्याची शक्यता कमी होणार आहे.

 

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार आहे. या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी उपलब्ध करणे प्रशासनासाठी कठीण होते. त्यामुळे कारभारात अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. ही अडचण टाळण्यासाठी आणि गावातील कामे सुरळीत सुरू राहावीत यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपेल, त्या दिवशी पदावर असलेले सरपंच पुढील काळात प्रशासक म्हणून काम पाहतील.

सरपंचांसोबत उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची एक प्रशासकीय समिती तयार केली जाणार आहे. ही समिती गावातील कामकाज पाहणार असून त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आवश्यक अधिकार देतील. ही व्यवस्था प्रशासक नियुक्त केल्यापासून 6 महिने किंवा नवीन निवडणुका होईपर्यंत लागू राहणार आहे.

दरम्यान, या निर्णयामागे अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुद्रुक गावच्या सरपंचांनी दाखल केलेल्या याचिकेचा मोठा प्रभाव आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामुळे सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सरपंचांना दिलासा मिळाला असून गावचा कारभार स्थानिक पातळीवरच सुरू राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
sharad pawar

Sharad Pawar : मोठी बातमी: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; तातडीने रुग्णालयात हलवणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.