पुणे : पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. मात्र यावेळी पुणेकरांनी थेट मांजरीचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला आहे. आणि मांजरीचा वाढदिवसाची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
पुण्यातील खरात कुटुंबीयांनी सोसायटीतील लहान मुलांना बोलावून मांजरीचा वाढदिवस जोमात साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करण्यात आलेली मांजर खरात कुटुंबीयांचा महत्वाचा भाग बनली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा जसा वाढदिवस साजरा केला जातो. तसाच वाढदिवस मांजरीचा वाढदिवस करतात.
दरम्यान, मांजर हा लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीची असते. त्यात पुणेकरांना वेगवेगळ्या जातीच्या मांजरी पाळायचा छंद कायम दिसून येतो. मांजरींच्या करामतीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त बघितल्या गेलेल्या व्हिडीओंची संख्या बघितली तर त्यात अधिक व्हिडीओ मांजरींचे असतात. त्यामुळे मांजरी कायमच्या सोशल मीडिया सेन्सेशन आहेत.
खरात कुटुंबाकडे गेल्या ८ वर्षापासून मिली नावाची मांजर राहते. मिलीचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. तेव्हा शेजारच्या लहान मुलांना बोलावून केक कापून वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे.