Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिस दलात खळबळ; पोलिस कर्मचाऱ्याने ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये लुबाडले, बनावट दस्तावेज तयार करून राष्ट्रपती पदकासाठी फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 July 2025, 16:33

पुणे: पुणे पोलिस दलात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस खात्यातील कर्मचारी गणेश अशोक जगताप याच्याविरोधात ५१ वर्षीय महिलेनं फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसाची वर्दी घालून जनतेच्या सेवेसाठी नेमलेला अधिकारीच गुन्हेगारीच्या दलदलीत असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘खाकी’ला डाग लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

तक्रारदार महिलेसह तिच्या पतीची ओळख असल्याचा गैरफायदा घेत जगताप यांनी “मी पोलीस खात्यात असल्यामुळे बँकेतून कर्ज मिळत नाही. माझ्याकडे ५ किलो सोने आहे, जे गहाण ठेवले आहे. लवकरच माझे प्रॉपर्टी डीलिंग पूर्ण होणार असून त्यातून सर्व पैसे आणि दागिने परत करीन,” अशा आश्वासनाच्या आधारे तब्बल ७३.५ तोळे सोने व रोख रक्कम आणि धनादेश स्वरूपात १७ लाख रुपये घेतले.

यामध्ये २४.६ तोळे सोने त्यांनी २६ ऑक्टोबर २०१९ रोजी, तर ४८.९ तोळे सोने २ जानेवारी २०२० रोजी घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासोबतच फिर्यादीच्या पती व मुलाकडून वेळोवेळी रोख रक्कमही घेतली गेली. मात्र, सांगितल्याप्रमाणे पैसे व दागिने परत न दिल्यामुळे महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

२१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप यांची बदली पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेत झाली होती. मात्र, ते तिथे हजर न राहता त्यांनी औंधमधील एका सराफी व्यावसायिकाला गंडवले. पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून त्यांनी सुमारे ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने घेतले. जेव्हा सराफी व्यावसायिकाने पैसे मागितले, तेव्हा जगताप यांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यावेळी तत्कालीन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्यांचे निलंबन केले होते.

 

राष्ट्रपती पदकासाठी बनावट कागदपत्रांची निर्मिती
गणेश जगताप यांनी २०२१ मध्ये राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी देखील बनावट सेवा नोंदी तयार करत सरकारची फसवणूक केली होती. या प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात जगताप आणि दोन लिपिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी सेवा पुस्तकात खोटी नोंद केली, बनावट दस्त तयार केला आणि त्यावर खोट्या सह्या व शिक्के मारत शासकीय नोंदी नष्ट केल्या. या प्रकरणामुळे पोलिस दलातील नियमावली आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कायदा रक्षकच बनला भक्षक?
या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून, कायदा रक्षकच जर गुन्हेगार ठरत असेल, तर सामान्य माणसाचा न्यायावरचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुणे पोलिस दलाने या प्रकरणी कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या सर्व प्रकारांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मळवली गेली असून, आरोपी गणेश जगताप याच्यावर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17
Next Post

न्हावरे परिसरात 'पीएमपीएल' च्या बस फेऱ्या कमी; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, परिसरातून प्रशासनाच्या निर्णयाला विरोध...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp