Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी कचरा डेपोतील डोंगर 2026 पर्यंत भुईसपाट होणार; 25 एकर जागा होणार मोकळी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 July 2025, 22:35

पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपो परिसरातील मागील 34 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याची ‘बायोमायनिंग’द्वारे विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 8 लाख क्युबिक मीटर कचरा हटवल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 15 लाख क्युबिक मीटर कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर 25 एकर जागा मोकळी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.

 

1991 पासून मोशी डेपोवर साठवला जातोय कचरा
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरातून दररोज 1400 टन कचरा तयार होतो, ज्यामध्ये ओला, सुका, हॉटेल, भाजी मंडई, जैववैद्यकीय प्रकारांचा समावेश आहे. 1991 पासून मोशी येथील 81 एकर जागेत कचरा साठवला जात असून, त्यातील 25 एकर जागा पूर्णपणे कचऱ्याच्या डोंगरांनी व्यापली आहे.

या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे महापालिकेने बायोमायनिंग तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला.

पहिला टप्पा यशस्वी; दुसऱ्या टप्प्यासाठी 105 कोटी खर्च अपेक्षित
पहिल्या टप्प्यात 8 लाख क्युबिक मीटर कचरा हटवण्यासाठी 42 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या टप्प्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात 15 लाख क्युबिक मीटर कचरा हटवण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी 105 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हे काम स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सुरू असून, महापालिकेला या प्रकल्पासाठी 27  कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान देखील मिळाले आहे. या कामाची मुदत 2026 पर्यंत आहे आणि त्याआधी काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यातील ठेकेदारांनाच पुढील जबाबदारी सोपवली आहे.

कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन
मोशी कचरा डेपोमध्ये फक्त बायोमायनिंग नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत:

-500 टन क्षमतेचा मॅकेनिकल कंपोस्ट युनिट: जैविक खत निर्मितीसाठी

-प्लास्टिकपासून ऑईल निर्मिती प्रकल्प

-सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती

-ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसद्वारे CNG तयार करण्याची यंत्रणा

-बांधकाम राडारोड्यांवर प्रक्रिया करून पेव्हर ब्लॉक, वाळू, खडी तयार करण्याची सुविधा

कचऱ्यातून सांडपाणी, खत, धातू वेगळी करून विल्हेवाट
बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे जमा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत असून, त्यामधून माती, वाळू, खत, प्लास्टिक, धातू वेगळे करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.

“पहिल्या टप्प्यात 8 लाख क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली असून, दुसऱ्या टप्प्यातील काम 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करून 25 एकर जागा पूर्णपणे रिकामी केली जाणार आहे. परिणामी, दुर्गंधी कमी होऊन परिसर अधिक स्वच्छ आणि वापरण्यास योग्य होईल.”
— संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Next Post

शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यावर खुनाचा आरोप; उद्धव कांबळे न्यायालयाच्या वॉरंटवर अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.