Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस; डोर्लेवाडीत 6 तास पाण्यावरच तरंगत होता मृतदेह, अखेर स्थानिक तरुणांनी काढला बाहेर

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 3 October 2025, 16:20

गोरख जाधव

डोर्लेवाडी : कऱ्हा नदी पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आहे. गुरुवारी (ता. 02) सकाळी हा मृतदेह डोर्लेवाडी (ता. बारामती) हद्दीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थ नदीकाठी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी काही नागरिकांना कऱ्हा नदी पात्रात एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. यावेळी ग्रामस्थांनी गावाचे पोलीस पाटील नवनाथ मदने यांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटीलांनी सदरची माहिती बारामती शहर पोलिसांना कळवली. त्यानुसार, घटनास्थळी पोलीस शिपाई गिरीश नेवसे हे एकटे आले होते.

सकाळी दिसून आलेला मृतदेह तब्बल सहा तास उलटल्यानंतरहि त्याच जागेवर बेवारसपणे पडून होता. पोलीस शिपाई नेवसे यांनी डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत डोर्लेवाडी, बारामती नगरपालिका, या सर्वांना मदतीसाठी फोन केले. मात्र, वेगवेगळे कारण सांगून हात झटकून मागे सरकले. यामुळे तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी जवळ जवळ 6 तास उलटून गेले होते. तरीही तो मृतदेह बेवारसपणे पाण्यामध्ये पडून होता. या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी विलंब झाला होता.

 

यावेळी गावातील काही तरुणांनी माणुसकी दाखवत शेवटी एकत्र येत पाण्यामध्ये उतरून तो मृतदेह बाहेर काढला. मृतदेह हा सडलेला असल्याने त्याच्या दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. तरीही तरुणांनी ते प्रेत बाहेर काढून पोलीस शिपाई यांच्या ताब्यात देत पुढील कारवाही साठी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून तो स्थानिक रहिवासी आहे की बाहेरून आलेला, याबाबत बारामती शहर पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे डोर्लेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील गावकऱ्यांकडून माहिती घेतली असून हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यू अपघाती आहे की इतर काही कारणामुळे, हे स्पष्ट होणार आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post
Daund News: Man's body found tied in a sack in Mula-Mutha river basin

Daund News: मुळा-मुठा नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp