Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे घ्यावा; प्राचार्य सीताराम गवळी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 7 May 2025, 18:37

लोणी काळभोर, ता. 7 : ग्रामीण भागात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत होती. मात्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म भरून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले आहे.

 

दहावीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात आले आहेत. या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात सुटसुटीतपणा येणार आहे. याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात आली आहे.

दरम्यान, अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना एका वेळी एकच प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच शाखेकरिता अर्ज करता येईल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर उपलब्ध असेल. सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाकरिता चार फेऱ्यांचे नियोजन दहावीच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. दहावीची टक्केवारी पाहून योग्य पद्धतीने कला, वाणिज्य व विज्ञान यापैकी योग्य शाखाची निवड करून कॉलेजच्या नावाची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. अशी माहिती प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10
Next Post

सासवडचा पाणीपुरवठा सुरळीत; कांबळवाडी येथील रोहित्र दुरुस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.