Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकण नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीस तीव्र विरोध; १६ ग्रामपंचायती आक्रमक, आंदोलन छेडण्याचा इशारा…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 14:25

पुणे : चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला आहे. मात्र, या प्रस्तावाला चाकण लगतच्या १६ गावच्या सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधींचा व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याबाबत निघोजे (ता. खेड) येथे बैठक घेऊन ग्रामपंचायती अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. हद्दवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

चाकण आणि त्यालगतचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे या गावांचा समावेश करून भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु ग्रामपंचायतींनी हद्दवाढीस विरोध केला आहे. पुढील दोन दिवसांत विविध ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना निवेदने व ठराव घेऊन भेटणार असल्याचे या वेळी ठरवण्यात आले. जबरदस्तीने व स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता याबाबत निर्णय घेतल्यास आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

‘निर्णय लादण्याची जबरदस्ती नको’
चाकण लगतच्या १६ गावच्या सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधींचा व ग्रामस्थांचा चाकण नगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाला विरोध आहे. सरकारने आमच्यावर जबरदस्तीने निर्णय लादल्यास आंदोलन करण्याचा इशारा मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांनी दिला.

 

‘गावच्या विकासासाठी आम्ही सक्षम’
चाकण लगतच्या १६ ग्रामपंचायती सक्षम आहेत. एमआयडीसीलगत असलेली निघोजे ग्रामपंचायत व आम्ही आमच्या गावचा विकास करण्यासाठी सक्षम आहोत. चाकण नगरपरिषदेमध्ये समावेश होण्यास संपूर्ण गावाचा विरोध आहे. चाकण परिषद हद्दीतील रस्ते, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था यांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे आमच्यावर हा निर्णय लादू नये, असे निघोजेच्या सरपंच सुनिता येळवंडे यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

नाशिक पोलिस दल हळहळले! कर्तव्य बजावून घरी जाताना एपीआयचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.