अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर शहरातील (Shirur News) शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज सायंकाळी 6.30 ते 7.15 या वेळेत शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये 5 पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे 1 अधिकारी व 40 जवान सहभागी झाले होते.

हा रूट मार्च शिरूर पोलीस स्टेशन ते बीजे कॉर्नर, एसटी स्टँड, राम आळी, पाच कंदील चौक, जैन मंदिर, एसटी स्टँड, डंबे नाला, सोनार आळी, सुभाष चौक, हलवाई चौक, सरदार पेठ, मारुती आळी, लाटे आळी, शनी मंदिर या प्रमुख मार्गावरून पार पडला.
शहरातील नागरिकांनी पोलीस दलाचे स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रूट मार्चमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.







