Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ! ‘तुमच्या शिध्यात मोठा बदल; पुढील 3 महिने तांदळाऐवजी मिळणार ‘हे’ धान्य…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 February 2026, 15:41
Ration Card: Big news for ration card holders! 'Big change in your ration; Instead of rice, you will get 'this' grain for the next 3 months...

पुणे: राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना दरमहा गहू आणि तांदूळ दिला जातो. मात्र मार्च महिन्यापासून या वितरणात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तांदळाऐवजी (Ration Card) लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा बदल पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो कुटुंबांच्या शिध्यात तात्पुरता बदल होणार आहे.

 

अहिल्यानगर जिल्हा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आठ खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून 28 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. खरेदी केलेला मका रेशन दुकानांमार्फत थेट लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. शासनाच्या सूत्रांनुसार, साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाईल. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 87 हजार 64 रेशनकार्डधारक असून एकूण 3 लाख 86 हजार 34 लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेत 6 लाख 37 हजार 114 रेशनकार्डधारक आणि 25 लाख 63 हजार 971 लाभार्थी आहेत. या सर्वांना नव्या पद्धतीने मका वाटप होणार आहे.

मात्र या निर्णयामुळे काही लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “मकाचे काय करायचे?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. ग्रामीण भागात मक्याचे पीठ, भाकरी किंवा धान्याच्या स्वरूपात वापर सामान्य असला, तरी शहरी कुटुंबांना त्याचा वापर कसा करावा याबाबत माहिती कमी आहे. अन्नपदार्थांच्या बदलत्या सवयी आणि तांदळाच्या सवयीमुळे हा बदल स्वीकारणे काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव येथे खरेदी सुरू असताना जामखेड आणि संगमनेर येथे अद्याप नोंदणी झालेली नसल्याची माहिती आहे. पुढील तीन महिने हा प्रयोग कसा राबवला जातो आणि लाभार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

BREAKING NEWS: Australia vs Zimbabwe; झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी धडाकेबाज विजय 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.