Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगड किल्ल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यातून तरुणीचा गंभीर अपघात; 8 ते 9 तासांच्या प्रयत्नानंतर युवतीला सुरक्षितपणे पायथ्याशी आणण्यात यश

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 10 October 2025, 17:42

विशाल शिंदे

 

राजगड : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण राजगड किल्ल्यावर गुरुवारी, दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी गंभीर अपघात घडला. किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय २४ वर्षे) या युवतीवर अचानक मधमाश्यांचा हल्ला झाला. घाबरल्यामुळे ती संतुलन गमावून सुमारे 40 फूट खोल दरीत कोसळली.

या घटनेत युवतीच्या मानक्यामध्ये (पाठीच्या कण्यामध्ये) फ्रॅक्चर झाल्यामुळे ती स्वतः हालचाल करू शकत नव्हती. तातडीने तिच्या बचावासाठी माहिती वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचवण्यात आली.

माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार व अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून रेस्क्यू चालवणे आवश्यक होते.

अखेर 8-9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजली पाटील हिला स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात यश आले. त्यानंतर तिला वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांच्या स्वाधीन करून प्राथमिक उपचार दिले गेले. पुढील उपचारासाठी तिला पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.

यावर तानाजी भोसले, अध्यक्ष, वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन संघ म्हणाले, “कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपातग्रस्तांना त्वरित मदत मिळणे आमचा प्राथमिक उद्देश आहे. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून आणि तांत्रिक कौशल्य वापरून आम्ही प्रत्येक रेस्क्यू यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो.”

या धाडसी रेस्क्यू मोहिमेत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम चे सदस्य सहभागी होते. तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे. या सर्व सदस्यांनी एकजूट आणि धैर्य दाखवत, सुरक्षित बचाव सुनिश्चित केला.

स्थानिक प्रशासन आणि वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन संघाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही जिल्ह्यातील आपातग्रस्त परिस्थितीत त्वरित मदत हवी असल्यास खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. (9763908501 / 8380817100) साथीच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत, वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम नागरिकांना विनामूल्य तात्काळ मदत उपलब्ध करून देईल.

सावधगिरीचे निर्देश :-

-ट्रेक करताना योग्य पादत्राणे, पाणी व प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवावे.

-मधमाश्या, साप किंवा अन्य वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता शांत राहून सुरक्षित ठिकाणी जावे.

-अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधावा.

दरम्यान, या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, संगठित बचाव कार्य आणि तत्पर आपत्ती व्यवस्थापन संघ नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
Next Post
Nhavare News: Leopard attacks bike rider in Vadgaon Rasai; Demand to catch leopard in a cage.....

Nhavare News: वडगाव रासाईत बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला; पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.