Pune Traffice : हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या, वाढता वाहनतळ आणि भविष्यातील प्रचंड विकासकामे लक्षात घेता भुयारी मार्गाची आवश्यकता प्रामुख्याने जाणवत होती. पुणे महानगर प्रदेशातील साडेसतरा नळी, अमनोरा पार्क टाऊनशिप आणि आसपासच्या परिसरातील भविष्यातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्गाची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केली होती. (Pune Traffice)

या मागणीसाठी शेतकरी आणि अमोल तुपे यांनी जोरदार आंदोलन छेडले होते. सर्वे नंबर 189 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून त्यांनी ही प्रक्रिया थांबवली होती. सरकारतर्फे मूळ प्रस्तावित 6 मीटरच्या भुयारी मार्गाला स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. वाढत्या लोकसंख्या आणि वाढत्या डेव्हलपमेंटमुळे भविष्यात ही व्याप्ती पूर्णपणे अपुरी ठरणार होती. त्यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि अमोल तुपे यांनी झाडावर चढून धाडसी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. रेल्वे प्रशासनाकडे अमोल तुपे यांनी पाठपुरावा केला होता.
आंदोलनाची दखल घेऊन शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले आणि नव्याने तयार होत असलेल्या विकास आराखड्यात (DP) भुयारी मार्गाची रुंदी 6 मीटरवरून थेट 30 मीटरवर वाढवण्यास मंजुरी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निर्णयाबाबत बोलताना अमोल नाना यशवंत तुपे म्हणाले,
“साडेसतरा नळी व अमनोरा पार्क परिसरात भविष्यात मोठी डेव्हलपमेंट होणार आहे. लाखो रहिवासी वाढतील, वाहतूक प्रचंड वाढेल. म्हणून भुयारी मार्गाची व्याप्ती वाढवण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली होती. ही मागणी मान्य करून नवीन DP मध्ये 30 मीटरचा भुयारी मार्ग मंजूर केल्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो.” या निर्णयामुळे केशवनगर, मांजरी वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे केशवनगर, साडेसतरानळी, अमनोरा टाऊनशिप, मांजरी, मांजरी तसेच आसपासच्या गावातील भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत होणार असून परिसराच्या विकासाला दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.







