Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फटाका स्टॉलच्या परवान्यासाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला; पुणे शहर पोलीसांचा प्रताप

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 October 2024, 19:35
pune police collecting 5 to 10 thousand from firecracker stall owner in pune

पुणे: पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिवाळी सणानिमित्त फटाका विक्री व साठा करण्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेण्याची जाहीर सुचना केली होती. तसेच यामधील गैरप्रकार टाळण्यासाठी 600 रुपयांचे परवानगी शुल्क पोलीस उपायुक्त कार्यालयात भरण्याचे परिपत्रक काढले होते. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुण्याच्या पूर्व भागात पठाणी वसुली करण्यासाठी पोलिसांकडून नवीन फंडा तयार करण्यात आला आहे. पोलिसांनी फटाका स्टॉल धारकांकडून सरसकट 5 ते 10 हजार उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची पोलिसांनीच पायमल्ली केल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 39 पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे 100 हून अधिक फटाका स्टॉल आहेत. तर पुणे शहरात 4 हजाराच्या आसपास फटाका स्टॉल आहेत. त्यामुळे एका स्टॉलकडून 10 हजार रुपयांप्रमाणे पैसे घेतले, तर 4 हजार स्टॉलकडून सुमारे 4 कोटींची रोकड जमा होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी नमूद केलेल्या शुल्काव्यतिरिक्त पोलिसांनी 5 ते 10 हजार उकळण्याची उठाठेव कशाला केली? एवढा पैसा कशासाठी आणि कोणासाठी गोळा केला जातोय? असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फटाका विक्रेत्यांची कागदपत्रे वैध असल्याने त्यांना परवाने दिले आहेत. मात्र, पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फटाका स्टॉलकडून सरसकट पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिले आहे. काही ठिकाणी ५ हजार, 7 हजार, तर काही ठिकाणी 10 हजार उकळण्यात आले आहेत. तसेच हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी दबावसुद्धा आणला जात आहे. याचा फटका फटाका विक्रेत्यांना बसत आहे. पोलिसांकडून त्यांची लुट केली जात आहे. या वसुलीमुळे फटाका विक्रेते व पोलिसांमध्ये वादावादी होत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अट्टाहास पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला महागात पडत असल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरु आहे.

करोडो रुपयांची माया जाणार कोठे?
विक्रेत्यांनी फटाका स्टॉलसाठी अधिकृत परवानगी घेतली असतानादेखील पोलीस प्रशासनाकडून सरसकट पैसे उकळले जात आहे. ही रक्कम कोणाच्या तिजोरीत जमा होणार? हा अट्टाहास कशासाठी? याचे गौडबंगाल अजूनही समजलेले नाही. त्यामुळे एवढी गोळा केलेली माया कोठे जाणार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुपितच आहे.

कारवाई होणार?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाला पुण्याच्या पूर्व भागात पोलिसांनी केराची टोपली दाखवून पठाणी वसुली सुरु केली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक स्टॉलकडून रोकड उकळली जात आहे. विक्रेते देखील पोलिसांच्या भीतीने पैसे देत आहेत. मात्र, अधिकृत परवानगी घेतली असतानाही पैसे उकळण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त अनधिकृत पैसे गोळा करण्यास सांगितले आहे, त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? याकडेही सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

विक्रेत्यांना आर्थिक झळ
दिवाळी सणानिमित्त फटाका स्टॉल लावून आपली दिवाळी गोड करू, असा मानस व्यक्त करून काही तरुण फटाका स्टॉल लावत आहे. या स्टॉलसाठी तरुण मागील 10 दिवसांपासून ग्रामपंचायत, एमएसईबी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत आहेत. याबरोबरच चरित्र पडताळणी, हमीपत्र, आधारकार्ड व विविध कागदपत्रे गोळा करून पोलीस उपायुक्त कार्यालयात अर्ज करीत आहे. त्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरुपात फटाके विकण्यासाठी परवानगी मिळत आहे. यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल इतकाच पैसा गोळा होणार आहे. मात्र, त्यातूनही पोलिसांकडून ५ ते १० हजार उकळले जात आहे. यामुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मालामाल होणार आहेत. मात्र, त्याची आर्थिक झळ विक्रेत्यांना बसत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00

सोनं खरेदीची सुवर्णसंधी? अमेरिका-इराण तणाव निवळताच दरामध्ये मोठी घसरण

Thursday, 9 April 2026, 15:59

हुबेहूब अजितदादा! चष्मा, तेच गुलाबी जॅकेट…! अजितदादांसारखा लूक करत पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

Thursday, 9 April 2026, 15:51
Next Post

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन लेखाधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.