Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांनो, बॅगा भरा! हिवाळी सुट्ट्यांसाठी ३ विशेष ट्रेन धावणार; पाहा कोणत्या शहरांसाठी आणि कसं असेल वेळापत्रक!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 12:57
Pune News

photo- ppn

Pune News : ख्रिसमस, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-हडपसर, पुणे-नागपूर आणि मध्य प्रदेशातील राणी कमलापती (भोपाळ)-हडपसर या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व गाड्यांची ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. (Pune News)

 

नियोजन काय आहे?
गाडी क्रमांक 01221 नागपूर-हडपसर विशेष गाडी 29 आणि 31 डिसेंबर तसेच 2 जानेवारी रोजी नागपूरहून रात्री 7.40 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता हडपसरला पोहोचेल. याउलट, 01222 हडपसर-नागपूर विशेष गाडी 28 व 30 डिसेंबर तसेच 1 आणि 4 जानेवारीला हडपसरहून दुपारी 3.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाड्यांना अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्डलाइन आणि उरुळी असे थांबे देण्यात आले आहेत.

तसेच गाडी क्रमांक 01419 पुणे-नागपूर विशेष गाडी 27, 29, 31 डिसेंबर आणि 3 जानेवारीला पुण्याहून रात्री 8.30 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 2.05 वाजता नागपूरला पोहोचेल. तर 01420 नागपूर-पुणे विशेष गाडी 28, 30 डिसेंबर तसेच 1 आणि 4 जानेवारीला नागपूरहून दुपारी 4.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुण्यात येईल.

याशिवाय मध्य प्रदेशातील राणी कमलापती (भोपाळ) ते हडपसर या मार्गावरही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 02156 राणी कमलापती-हडपसर विशेष गाडी 27 डिसेंबर तसेच 3 आणि 10 जानेवारीला सकाळी 8.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.10 वाजता हडपसरला पोहोचेल. तर 02155 हडपसर-राणी कमलापती विशेष गाडी 28 डिसेंबर तसेच 4 आणि 11 जानेवारीला सकाळी 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.40 वाजता राणी कमलापती येथे पोहोचेल. या गाडीला नर्मदापुरम, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्डलाइन असे थांबे असतील.

दरम्यान, सुट्ट्यांच्या काळात पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सातत्याने काही तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पर्यटनासाठी किंवा गावी जाण्यासाठी अनेकांनी दोन महिने आधीच तिकीट बुकिंग केलं असलं तरी गाड्यांच्या उशिरामुळे त्यांचे नियोजन कोलमडत आहे. पुण्यातून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर, कन्याकुमारी अशा महत्त्वाच्या ठिकाणांसाठी जाणाऱ्या गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी आहे.

काही ठिकाणी सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबवाव्या लागत असून त्यामुळे पुढील स्थानकांवर पोहोचायला उशीर होत आहे. बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीचं काम सुरू आहे, तर इतर काही विभागांत तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्याचं काम सुरू असल्याने रेल्वेच्या वेगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हजरत निझामुद्दीन, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-सांत्रागाची आणि दानापूरसारख्या गाड्या पुण्यात पोहोचायला सात ते आठ तास उशिरा येत आहेत. पुण्यातून गाड्या वेळेवर सुटत असल्या, तरी पुढील मार्गावर होणाऱ्या अडथळ्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39
Next Post

चार तहसीलदारांसह दहा जणांचे निलंबन मागे; मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.