पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट (Pune News) सहाच्या पथकाने पुन्हा (Pune Police) एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध भागातून हरवलेले मोबाईल शोधून काढत पोलिसांनी तब्बल 25 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 5 लाख 11 हजार रुपये इतकी आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी युनिट सहाकडील पोलीस हवालदार सारंग दळे आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सीईआर पोर्टलवरील माहिती गोळा केली. त्यानंतर संगणक विभागातील महिला पोलीस अंमलदार तरंगे यांच्या मदतीने या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
तांत्रिक तपासानंतर वाघोली, लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. या सर्व मोबाईल फोन विविध कंपन्यांचे असून, सध्या हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनांनुसार ही मोहीम राबवण्यात आली होती.
या कारवाईत पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, सारंग दळे, गिरीश नाणेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या मोबाईल परत मिळणार असून, या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







