Pune News : पुणे येथील ढोले पाटील रस्त्यावर धक्कादायक घटना घडली. हॉटेल कपिलाजवळ सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान दुपारी अचानक स्लॅब कोसळला. या घडनेत दोन कामगार अडकले होते. दुपारी अचानक स्लॅब खाली आल्याने परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मोठ्या आवाजासह हा स्लॅब खाली आला. आणि यात २ कामगार अडकले. स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर त्यांच्या तीन गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या. Pune News

बचाव पथकांनी ढिगाऱ्याकडे वाट काढत वेगाने काम सुरू केले. काही प्रयत्नांनंतर अडकलेल्या एका कामगाराला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. परंतु ते कामगार गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नूतनीकरणाच्या कामादरम्यान सुरक्षा उपाय पाळले गेले होते की नाही आणि स्लॅब नेमका का कोसळला.याचा तपास पोलीस व अग्निशमन दलाच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे.







