राहुलकुमार अवचट

Yawat : दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाच्या वतीने रात्रीचे भार नियमन होत असल्याने या अन्यायकारक भारनियमाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने दौंड तालुकाध्यक्ष रामभाऊ टुले यांच्या नेतृत्वात महावितरण विभागाच्या दापोडी कार्यालयावर एल्गार आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दौंड तालुक्यातील अन्यायकारक भारनियमन त्वरित बंद करण्याबाबत महावितरण वविभागाचे कार्यकारी अभियंता आल्हाट यांना निवेदन देण्यात आले असून गेल्या अनेक दिवसांपासून दौंड तालुक्यात महावितरणतर्फे संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० या वेळेत सर्रासपणे भारनियमन (लोडशेडींग) करण्यात येत असून महावितरणचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून यामुळे सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानः सध्या शैक्षणिक वर्षाचा शेवट असून विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. संध्याकाळ होत असलेल्या भार नियमामुळे अंधार होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा व्यत्यय येत आहे.सध्या सुरू असलेला उन्हाळा, नुकताच तालुक्यात ठिकठिकाणी होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे हवेतील आर्द्रता आणि उकाडा प्रचंड वाढला असून, वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले प्रचंड त्रस्त आहेत तसेच सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून विविध गावांमध्ये यात्रा आणि जत्रांचे आयोजन केले जात आहे. अशा काळात रात्रीच्या वेळी लोडशेडींगमुळे परिसरात अंधार पसरत असल्याने चोरीसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही यांसह शेतकरी व नागरिकांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या अन्यायकारक भारनियमनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी महावितरण विभागाने जनतेची होणारी ही गैरसोय त्वरित थांबवावी आणि भारनियमन तात्काळ बंद करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून महावितरण विभागाने भारनियमन असेच सुरू ठेवले, तर दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे असून यावेळी महावितरण विभागाच्या वतीने वीजपुरवठा सुरळीतपणे चालू करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रामभाऊ टुले यांनी दिली. (Yawat)
यावेळी प्रदेश सरचिटणीस अजित शितोळे,चैतन्य पाटोळे, तालुका युवक अध्यक्ष अमित दोरगे,ज्ञानेश्वर गुलाबराव लकडे, विजय शेंडगे,सचिन शिंदे, राजेंद्र पांढरे, महेश ताकवणे, विजयराव चव्हाण, सर्जेराव टुले,उत्तम जराड यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.







