Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माऊली कटके यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार : प्रदीप कंद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 November 2024, 20:44

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. ४ ऑक्टोंबर आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद आणि अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शांताराम कटके यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांचा विजयाचा मार्ग अधिकच सोपा झाल्याचे मानले जात आहे. सलामीलाच महायुतीने मोठा राजकीय डाव जिंकला असून माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाल्याची चर्चा रंगत आहे.

महायुतीची एकजूट आणि प्रदीप कंदांची भूमिका..

अर्ज माघारीनंतर बोलताना प्रदीप कंद यांनी स्पष्ट केले की, “मी महायुतीचा एकनिष्ठ आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे. आता माऊली कटके यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार आहे.” देवेंद्र फडणवीस यांनी कंद यांना योग्य पदी संधी देण्याचे आश्वासन दिल्याने कंद यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीने कटके यांच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून हवेलितील मुख्य राजकीय वजनदार आता प्रचारात आल्याने कटके यांची विजयाकडे घौडदौड सुरू झाल्याची चर्चा रंगत आहे.

काटे की टक्कर-श्रावणबाळ विरुद्ध कार्यसम्राट..

शिरूर हवेली मतदारसंघात आता मुख्य लढत विद्यमान आमदार अशोक पवार आणि महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्यात रंगणार आहे. माऊली कटके हे श्रावणबाळ आणि जनसेवक म्हणून परिचित असून, विकास कामांसह, माणुसकी असलेला, गर्व व एकलकोंडा नसलेले माऊली कटके यांच्याविषयी प्रचंड आपुलकी व जिव्हाळा असून त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार अशोक पवार हे विकास कामांमुळे कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. या दोन नेत्यांमध्ये होणारी लढत काटे की टक्कर ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

महायुतीची शक्ती प्रदर्शनासाठी सज्ज..

अर्ज माघारीनंतर महायुतीचे एकवटलेले बळ आणि एकनिष्ठता पुन्हा सिद्ध झाली आहे. कंद आणि कटके यांचे अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते आता कटके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकदीने मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.

 

प्रदीप कंद यांनी जिंकले वरिष्ठांचे मन..

राजकारणात पदासाठी पक्ष बदलणारी प्रसंगी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे उमेदवार दिसत असले तरी प्रदीप कंद हे सुसंस्कृत, आज्ञाधारी, पक्षनिष्ठ तसेच वरिष्ठांच्या शब्दाला मान देत स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत पक्षादेश व पक्षशिस्त पाळणारे नेतृत्व असल्याने प्रदीप कंद यांची माघारी म्हणजे माऊली कटके यांची विजयाची नांदी ठरणार असून प्रदीप कंदांनी वरिष्ठांसह, महायुतीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांचे मन जिंकले आहे.

शांताराम कटके अजित पवारांचे अत्यंत विश्वासू..

शांताराम कटके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे, एकनिष्ठ व विश्वासू म्हणून पुणे जिल्ह्याला परिचित असून केवळ अजित पवारांच्या एका शब्दावर त्यांनी मोठ्या मनाने माघार घेत माऊली कटके यांचा विजयाचा मार्ग सुखकर केला आहे. वघोललीतील एकी ही कटके यांचे मताधिक्य वाढविणारी व समोरच्याच्या मनात धडकी भरवणारी ठरणार आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात जनतेने महायुतीचा विजय अनुभवण्याची तयारी सुरू केली असून, माऊली कटके यांच्या नेतृत्वात महायुतीची वज्रमूठ अधिक बळकट होत चालली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34
Next Post

'पाचगणी' फेस्टिव्हलच्या निमित्ताने शहराच्या नावलौकिकतेला चालना; अमीर खान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp