Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये वाहतूक पोलिसांचा ‘दुहेरी न्याय’; कष्टकऱ्यांवर कारवाई, अवजड वाहने व अवैध प्रवासी वाहतूक मोकाट!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 February 2026, 14:51

लोणी काळभोर, ता. 14: पुणे-सोलापूर महामार्गावरून अवजड व अवैध प्रवासी वाहतूक दिवसाढवळ्या सुसाट सुरू आहे. त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून सामान्य दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. मागील चार दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या या “दंड मोहिमेने” कष्टकरी, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

 

लोणी स्टेशन चौक व थेऊर फाटा येथे बुधवार (ता. 11) ते शनिवार (ता. 14) या कालावधीत वाहतूक पोलिसांचे घोळके रस्त्यातच उभे राहत असून दुचाकी गाड्या आडवताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी कामावर निघालेले कर्मचारी, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी तासन्‌तास अडकून पडत असल्याचे चित्र रोजचे झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, याच मार्गावरून नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणारी अवजड वाहने, ओव्हरलोड ट्रक व खासगी बस मात्र निर्धास्तपणे धावत आहेत. “मोठ्यांना मोकळीक आणि छोट्यांवर कारवाई” असा दुहेरी न्याय का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करून फक्त हेल्मेट, कागदपत्रे किंवा किरकोळ कारणांवर सर्वसामान्यांकडून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप होत आहे.

वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस रस्त्यातच वाहने अडवून स्वतःच कोंडी वाढवत आहेत. यामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांनाही अडथळे येत आहेत. “वाहतूक शिस्तीच्या नावाखाली दंडाची लूट सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, पुणे शहर वाहतूक पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून अवैध व अवजड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच सामान्य नागरिकांना वेठीस धरणारी ही दंड मोहिम थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “पोलीस म्हणजे संरक्षण की दंड वसुली यंत्रणा?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जीव धोक्यात घालणारी अवैध प्रवासी वाहतूक!

रिक्षा व सहा-सीटर वाहनांतून सर्रास धोकादायक प्रवासी वाहतूक सुरू आहे. नियमांनुसार रिक्षामध्ये केवळ 3 प्रवासी बसवण्याची परवानगी असताना, प्रत्यक्षात तब्बल 8 ते 10 प्रवासी कोंबले जात आहेत. सहा-सीटर वाहनांमध्ये तर 11 ते 12 प्रवासी भरून वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हडपसर ते वरवंड दरम्यान खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या अवैध वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते; मात्र सामान्य दुचाकीस्वारांना अडवून दंड वसुली केला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post
Crime

Crime : ‘डार्क एक्सपेरिमेंट’चा थरारक शेवट! चव पाहण्याच्या हट्टात चार अल्पवयीन मुलींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.