Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : सापांना जीवदान देणाऱ्या थेऊर येथील सर्पमित्राचा साप चावल्याने मृत्यू; परिसरात हळहळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 26 May 2026, 18:11

लोणी काळभोर, (पुणे) : साप पकडत असताना थेऊर (ता. हवेली) येथील एका 21 वर्षीय तरुण सर्पमित्राचा साप चावून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. 25) सायंकाळी ही घटना घडली.

दिपक संतोष जाधव (वय 21, गोरक्षक/सर्पमित्र, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर. ता. हवेली) असे मृत पावलेल्या धाडसी तरुण सर्पमित्राचे नाव असून, त्याच्या या अकाली निधनामुळे थेऊरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक जाधव हे मागील अनेक दिवसांपासून विनामोबदला साप पकडत होते. हा अत्यंत मनमिळावू आणि धाडसी तरुण होता. परिसरात तो एक सक्रिय गोरक्षक आणि सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. कुठेही कोणाच्या घरात किंवा शेतात साप निघाल्यास नागरिक दीपकला फोन करत असत आणि तो देखील जीवाची पर्वा न करता तातडीने तिथे पोहोचून सापांना सुखरूप पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करत असे.

 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास कोलवडी गावच्या हद्दीत एका ठिकाणी साप निघाल्याची माहिती दीपकला मिळाली होती. त्यानुसार तो नेहमीप्रमाणे सापाला जीवदान देण्यासाठी तिथे पोहोचला. शोधमोहीम सुरू असताना, एका ठिकाणी पडलेल्या पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली साप लपल्याचा त्याला संशय आला. दीपकने पत्र्याच्या खाली हात घातला असता यावेळी पत्र्याखाली दबा धरून बसलेल्या सापाने दीपकच्या हाताला दंश केला.

दरम्यान, सापाने दंश केल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आणि मित्रांनी दीपकला तात्काळ उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दीपकच्या पश्चात त्याचा मोठा मित्रपरिवार असून, सर्व स्तरांतून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

शासकीय नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश; टोळीतील आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.