Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शासकीय नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश; टोळीतील आरोपी जेरबंद

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 26 May 2026, 18:25

बारामती: शासकीय नोकरीचे खोटे आमिष दाखवून सुशिक्षित तरुण-तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देऊन उमेदवारांना तब्बल 1 कोटी 36 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी सूरज तिमय्या असदकर (वय 39 वर्षे, व्यवसाय- डिलिव्हरी बॉय, रा. पडवळ आळी, गोखले हॉल जवळ, चिंचवड गाव, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे बनावट नोकरीचे रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार सन 2023 ते 4 मे 2025 या कालावधीत बारामतीमधील तांदुळवाडी येथील महिला रुग्णालय आणि मळद परिसरात घडला. मुख्य आरोपी अनिकेत पाठक याने शासकीय रुग्णालयात ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवले होते. यानंतर त्याने त्याचे साथीदार अजिंक्य पाठक, सिओना साळवे, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने अनेक उमेदवारांकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात कोट्यवधी रुपये उकळले. उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीने त्यांना चक्क बनावट शासकीय नियुक्तीपत्रे देखील दिली होती.

 

नोकरी लागत नसल्याचे समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या उमेदवारांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मार्च 2026 मध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील आरोपी सुरज असदकर हा चिंचवडगाव येथे त्याच्या घरी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने पैशांच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच दौंड येथील अजिंक्य पाठक आणि येरवड्यातील सुधाकर सोळंकी यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे आणि विठ्ठल तरंगे यांनी कारवाई केली. या रॅकेटमधील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाप रे! बनावट सोनं ठेवून HDFC बँकेला 18 लाखांचा चुना, रांजणगावमधील धक्कादायक प्रकार; 12 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 26 May 2026, 21:17

पुणे-सातारा हायवेवर खळबळ! भोरजवळ संशयास्पद उभ्या असलेल्या ‘स्विफ्ट कार’मध्ये आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Tuesday, 26 May 2026, 21:01

जागावाटपाचा सस्पेन्स कायम! पुण्याच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने; पाहा कुठे कुणाची किती ताकद

Tuesday, 26 May 2026, 20:55

लग्नाच्या खर्चाला फाटा! नांदेडच्या पेठकर नवदाम्पत्याने गावकऱ्यांना दिलं 33 कोटींचं ‘रिटर्न गिफ्ट’; संपूर्ण गावाचा काढला विमा!

Tuesday, 26 May 2026, 19:54

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! एका चुकीच्या निर्णयामुळे धुरंधरचं करिअर धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण?

Tuesday, 26 May 2026, 19:32

शासकीय नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश; टोळीतील आरोपी जेरबंद

Tuesday, 26 May 2026, 18:25
Next Post

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! एका चुकीच्या निर्णयामुळे धुरंधरचं करिअर धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.