Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच जुलैला होणार मतदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 28 May 2026, 15:57
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती इमारत, शिरुर

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर साडेतीन वर्षांनी वाजले असून, बाजार समितीच्या १८ जागांसाठी येत्या ५ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.

 

शिरूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०२२ मध्ये संपल्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू होता. अखेर बुधवारी, दि. २७ रोजी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार शुक्रवार, दि. २९ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, ४ जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ५ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर २२ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २३ जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. येत्या ५ जुलै रोजी १८ जागांसाठी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी सांगितले.

बाजार समितीसाठी सेवा सहकारी मतदार संघातून ११ जागांपैकी सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, दोन महिला प्रतिनिधींसाठी आणि इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती-विमुक्त जमातीसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागांपैकी दोन जागा खुल्या असून, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी एक जागा आहे. तसेच, व्यापारी-आडते मतदार संघातून दोन आणि हमाल-मापाडी मतदार संघातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे.

दरम्यान, नवीन सहकार नियमानुसार दहा गुंठ्यांपेक्षा अधिक शेती क्षेत्र असलेल्या कोणत्याही गावातील शेतकऱ्याला ही निवडणूक लढविता येणार असल्याने, यंदा उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बाजार समितीवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असले तरी, यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्तेत महायुतीच्या माध्यमातून एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रिल स्टार रोहिणी पाराध्ये यांनी का केली आत्महत्या? काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 16:08
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती इमारत, शिरुर

शिरुर बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच जुलैला होणार मतदान

Thursday, 28 May 2026, 15:57

पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

Thursday, 28 May 2026, 15:52

महायुतीचा ’11-4-2′ फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

Thursday, 28 May 2026, 15:31

नीट परीक्षेच्या गोपनीयतेची जबाबदारी आता इंडियन आर्मीवर? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Thursday, 28 May 2026, 15:13

लोणी काळभोरमध्ये बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून वारंवार बलात्कार

Thursday, 28 May 2026, 14:49
Next Post

रिल स्टार रोहिणी पाराध्ये यांनी का केली आत्महत्या? काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.