Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शिरूर तालुक्यात 75.59 टक्के विक्रमी मतदान; वाढलेली टक्केवारी कोणाच्या विजय-पराभवाची नांदी?

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 8 February 2026, 9:22

शिरूर: शिरूर तालुक्यात शनिवारी(ता.07)पार पडलेल्या 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सरासरी 75.59 टक्के मतदान झाले. तालुक्यातील एकूण 2 लाख 28 हजार 119 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून,यामध्ये 1 लाख 18 हजार 685 पुरुष तर 1 लाख 9 हजार 422 महिला मतदारांसह इतर 6 जणांचा समावेश आहे.

 

यंदाच्या निवडणुकीत कवठे येमाई–टाकळी हाजी,रांजणगाव गणपती–कारेगाव आणि तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटांमध्ये तालुक्याच्या सरासरीपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे.मतदानाच्या आदल्या रात्री झालेले लक्ष्मी दर्शन,भेटवस्तूंचे वाटप, तसेच निवडणुकीच्या अगोदर मतदारांना घडवलेले देवदर्शन यांचा परिणाम या गटांतील वाढलेल्या मतदानावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.वाढलेली मतदानाची टक्केवारी नेमकी कोणासाठी पोषक आणि कोणासाठी घातक ठरणार,याचा फैसला सोमवारी (ता.09)होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होणार आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही अनेक उमेदवार विजयाबाबत साशंक असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यंदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजली.तालुक्यातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांसह अनेक उमेदवारांनी कपडे बदलावेत तशी पक्षांतरं केली.यामुळे अनेकांची राजकीय निष्ठा व प्रतिष्ठा प्रश्नचिन्हाखाली आली असून,त्याचा परिणाम अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंगच्या स्वरूपात दिसून आल्याची चर्चा आहे.

गटनिहाय मतदानाचा आढावा खालील प्रमाणे :

कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गट

टाकळी हाजी पंचायत समिती गण : 16735मतदान (80.74%)

कवठे येमाई पंचायत समिती गण : 16688 मतदान (85.99%)

न्हावरे–शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गट

शिरूर ग्रामीण पंचायत समिती गण : 17107 मतदान (72.69%)

न्हावरे पंचायत समिती गण : 14781 मतदान (सुमारे 75%)

रांजणगाव गणपती–कारेगाव जिल्हा परिषद गट

रांजणगाव गणपती पंचायत समिती गण : 16870 मतदान (81.37%)

कारेगाव पंचायत समिती गण : 16363 मतदान (80.25%)

पाबळ–केंदूर जिल्हा परिषद गट

पाबळ पंचायत समिती गण : 16962 मतदान (72.83%)

केंदूर पंचायत समिती गण : 17951 मतदान (76.94%)

शिक्रापूर–सणसवाडी जिल्हा परिषद गट

शिक्रापूर पंचायत समिती गण : 14950मतदान (70.66%)

सणसवाडी पंचायत समिती गण : 14045 मतदान (71.70%)

तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट

तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गण : 17475मतदान (75.71%)

रांजणगाव सांडस पंचायत समिती गण :16708मतदान (81.12%)

वडगाव रासाई–मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट

वडगाव रासाई पंचायत समिती गण : 16051मतदान (72.13%)

मांडवगण फराटा पंचायत समिती गण : 15427 मतदान (71.97%)

एकूणच, शिरूर तालुक्यातील ही निवडणूक उच्च मतदान,राजकीय उलथापालथ आणि अनिश्चित निकाल यामुळे लक्षवेधी ठरली आहे.आता सर्वांचे लक्ष सोमवारी (ता.09) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून,वाढलेल्या मतदानाचा राजकीय गणितावर नेमका कसा परिणाम होतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तालुक्यातील सर्वत्र किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदार पार पडले.तसेच मतमोजणी सोमवारी(ता.09)सकाळी 8 वाजल्यापासून रांजणगाव गणपती एमआयडीसी येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन नंबर 2 येथे पार पडणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post

Karmala News: करमाळा तालुक्यात 61.92 टक्के मतदान; मतदारांचा फैसला मतपेटीत बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.