Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकाला लुटले; 6 जणांची टोळी जेरबंद 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 30 September 2024, 17:50

उरुळी कांचन, (पुणे) : पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणा-या सराईत टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे व बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक चारचाकी गाडी व दोन गावठी पिस्टल असा 2 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष लक्ष्मण भंडलकर, (वय- 42, रा. उमाजी नाईक चौक, एसटी स्टैंड शेजारी, पणदरे, ता. बारामती), सुरेश अशोक राखपसरे, (वय-33, रा. के. के. घुले विदयालय समोर, कुंजीरवस्ती, मांजरी, ता. हवेली), शेखर सुभाष शिंदे, रा. सांगवी, ता. बारामती), सुरज शंकर मदने (सध्या रा. माळेगाव, ता. बारामती, मुळ रा. सगोबाची वाडी, पणदरे, ता. बारामती), हरीभाऊ बबन खुडे, अशोक गणपत बनसोडे (दोघे रा. के. के, घुले विद्यालय जवळ, कुंजीर वस्ती, मांजरी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कुतुबुद्दीन सुभेदार शहा यांचे भंगार खरेदी-विक्रीचे दुकान आहे. सोमवारी (ता. 23) शहा हे दुकानावर असताना चार अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पांढरे रंगाचे आय-20 कार विक्री करावयाची आहे असे सांगितले. कारला कोणताही नंबर नसल्याने फिर्यादीने कार खरेदी करण्यास नकार दिला.

त्यामुळे आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून ते घेऊन आलेल्या चारचाकी गाडीत बसवून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. तु चोरीचा माल खरेदी केला आहे, पंधरा लाख रूपये दे नाहीतर, तुला भिगवण पोलीस स्टेशनला घेवून जाऊ, अशी धमकी दिली. यावेळी फिर्यादी शहा यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यातील एकाने पिस्तुलचा धाक दाखवून ओरडायचे नाही असे सांगितले. त्यानंतर त्यास दौंड-नगर हायवे रोडने घेवून जावून चिखली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले. अशी फिर्याद दिली होती.

 

सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा व बारामती ग्रामीण पोलीस तपास करीत असताना आरोपीचे, कारचे वर्णन प्राप्त करून सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले. यावेळी पांढरे रंगाची आय-२० कार आढळून आली. तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कार ही संतोष भंडलकर हा वापरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने संतोष भंडलकर हा चारचाकी कार घेऊन इतर साथीदारांसह सोलापूर बाजूकडे जात असल्याची बातमी मिळाली. तांत्रिक विश्लेषणा द्वारे तातडीने नियोजन करून हिंगणगाव परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

संशयित आरोपी संतोष भंडलकर याचा शोध घेण्यास सुरूवात केली असता, संतोष भंडलकर हा त्याचेकडील आय-२० कारने त्याचे इतर साथीदारांसह सोलापूर बाजूकडे जात असल्याची बातमी मिळाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तातडीने नियोजन करून पोलिसांनी संतोष भंडलकर व सुरेश राखपसरे यांना हिंगणगाव (ता. हवेली) परिसरातून ताब्यात घेतले.

दरम्यान, त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील आरोपींनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. शेखर शिंदे याला सांगवी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चारचाकी कार व गुन्ह्यात वापरलेली एकूण दोन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतूस असा 2 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींकडे सोलापूर रोडला गेल्याचे कारण विचारले असता आरोपींनी सांगोला-जत मार्गावरील शेगाव गावातील सोनार व्यावसायिकास लुटणार असल्याची माहिती दिली तर यातील आरोपी सुरज मदने याने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा केला असल्याची माहिती दिली. राहते घरासमोर एक ट्रॅक्टर मिळून आला असून सदर ट्रॅक्टरचे मालकाचा शोध घेण्यात येत आहे. सदरचा ट्रॅक्टर कोठून चोरी झाला, याबाबत तपास सुरु आहे.

सुरज मदने हा सराईत ट्रॅक्टर चोर

आरोपी सुरज शंकर मदने हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सातारा जिल्हयातील लोणंद, वाठार, भुईज, फलटण, सातारा शहर, तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत, बारामती तालुका, बारामती शहर पोलीस स्टेशनला एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. तो सराईत ट्रॅक्टर चोर आहे. तसेच इतर आरोपींवर देखील प्रत्येकी दोन-तीन गुन्हे दाखल असून सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, दत्ताजी मोहिते, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, विनोद पवार, अजय घुले, राजु मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धिरज जाधव, तुषार भोईटे, सागर नामदास, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, अंमलदार राम कानगुडे यांनी केली असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
leopard attack on woman in rahokadi junnar pune

जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे लागोपाठ दोन दिवस सापडले मृत अवस्थेतील बिबटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp