Wednesday, February 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या 7 गटांचे आणि पंचायत समितीच्या  14 गणांचे आरक्षण जाहीर; अनेकांचे राजकीय स्वप्न भंगले, तर महिलांना मिळाली मोठी संधी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 October 2025, 17:52
Reservation of 7 groups of Zilla Parishad and 14 groups of Panchayat Samiti announced for Shirur taluka; While the political dreams of many were shattered, women got a big opportunity...

Photo-Pune Prime News

पोपट पाचंगे 

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती (Shirur Panchayat Samiti Reservation Announced)  गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज (ता.13)शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडला असून, सन-2025 च्या नव्या आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या सात गटांसह पंचायत समितीच्या चौदा गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित कोलमडले असून, काहींची स्वप्ने भंग झाली आहेत. तर महिलांना या सोडतीमुळे मोठी राजकीय संधी मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी चार गटांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यात शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गट ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला असून, रांजणगाव गणपती-कारेगाव, शिक्रापूर-सणसवाडी तसेच तळेगाव-ढमढेरे, रांजणगाव-सांडस हे गट सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत. तसेच टाकळीहाजी-कवठे यमाई आणि केंदूर-पाबळ हे गट सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत,तर वडगाव रासाई-मांडवगण फराटा हा गट इतर मागासवर्गीय (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण सात गटांपैकी महिला आरक्षण असलेले चार गट असल्यामुळे तालुक्यात महिला नेतृत्वाचा प्रभाव वाढणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या चौदा गणांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या वडगाव रासाई गणामध्ये अनुसूचित जाती (SC) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यात अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या प्रमाण कमी असल्याने यंदा कोणत्याही गणात अनुसूचित जमातीचे आरक्षण आलेले नाही. तर इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची लोकसंख्या विचारात घेऊन एकूण तीन गणांमध्ये ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी दोन जागा ओबीसी महिला आणि एक जागा ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गात निश्चित करण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीनंतर उरलेल्या दहा गणांपैकी पाच जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर पाच जागा सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी आहेत. पंचायत समितीच्या चौदा गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

1.वडगाव रासाई(अनुसूचित जाती)

2.मांडवगण फराटा(ओबीसी महिला)

3.शिरूर ग्रामीण (ओबीसी महिला)

4.न्हावरे (सर्वसाधारण)

5.पाबळ (ओबीसी)

6.केंदूर (सर्वसाधारण महिला)

7.कवठे यमाई (सर्वसाधारण महिला)

8.टाकळी हाजी (ओबीसी महिला)

9.तळेगाव ढमढेरे(सर्वसाधारण महिला)

10.रांजणगाव सांडस (सर्वसाधारण)

11.शिक्रापूर (सर्वसाधारण)

12.सणसवाडी(सर्वसाधारण महिला)

13.रांजणगाव गणपती(सर्वसाधारण)

14.कारेगाव (सर्वसाधारण)

या नव्या आरक्षणामुळे शिरूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये नव्या समीकरणांना सुरुवात होणार असून, महिला उमेदवारांसाठी हे आरक्षण नवे दरवाजे उघडणारे ठरणार आहे. काही ठिकाणी महिला आरक्षणामुळे नव्या नेतृत्वाचा उदय होईल, तर काही ठिकाणी विद्यमान नेत्यांना आपला गण गमावल्यामुळे नाराजी व्यक्त करावी लागली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, पुढील निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आता आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घड्याळावरची निष्ठा म्हणजे विकासावरची मोहोर; अजितदादांच्या विचारांना हीच खरी श्रद्धांजली- बाळूआप्पा चौधरी

Wednesday, 4 February 2026, 21:53
Dive Ghat Closed: Punekars, beware! Dive Ghat will be completely closed for 3 hours tomorrow; 'Blast' will be done for road widening, traffic on Hadapsar to Saswad route will be stopped

Dive Ghat Closed: पुणेकरांनो सावधान! उद्या दिवेघाट 3 तास पूर्णतः बंद; रस्ता रुंदीकरणासाठी होणार ‘ब्लास्टिंग’, हडपसर ते सासवड मार्गावरील वाहतूक थांबणार

Wednesday, 4 February 2026, 21:31

Loni Kalbhor News: लोणी काळभोर पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या; दोन गुन्ह्यांची उकल

Wednesday, 4 February 2026, 21:22
Bribe News: Suspicion arose while accepting a bribe and the public servant ran straight to the bathroom! ACB chased and arrested him

Bribe News: लाच स्वीकारताना संशय आला अन् लोकसेवक पळाला थेट बाथरूममध्ये! एसीबीने पाठलाग करून ठोकल्या बेड्या

Wednesday, 4 February 2026, 20:51
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Loni Kalbhor News: भाजपच्या लोणी काळभोर-कदमवाकवस्ती गटातील उमेदवारावर द्विभार्या व मानसिक छळाचा पोलिसात गुन्हा दाखल; भाजपला ऐन निवडणूक काळात मोठा धक्का

Wednesday, 4 February 2026, 20:33
mumbai

mumbai : बंद लिफ्टमध्ये ज्वलनशील फुगे; गोरेगावच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा भीषण स्फोट, काटा आणणारा Video आला समोर…

Wednesday, 4 February 2026, 19:58
Next Post
Women's rule in Karmala..! After the Panchayat Samiti, reservation for six groups of Zilla Parishad was announced...

करमाळ्यात महिलाराज..! पंचायत समीती नंतर जिल्हा परिषदेच्या सहा गटांचे आरक्षण जाहीर... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.