आदित्य बोराटे

इंदापूर: अल्पवयीन (Pune News) मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी युवकाला न्यायालयाने 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका 33 वर्षे युवकाने शाळेत जात असलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची घटना 30 नोव्हेंबर 2016 मध्ये घडली होती.

विनयभंगाच्या या घटनेला गांभीर्याने घेत न्यायालयाने आरोपी युवकाला चांगलाच धडा शिकवल्याने असं कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या खटल्यावर निकाल देत मंगळवारी न्यायालयाने आरोपी युवकाला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एक युवती शाळेत जात असताना आरोपी युवकाने तिचा हात पकडून तिला ओढून घेत तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात पीडित मुलीने सागर भीमराव शेलार (वय 33 वर्ष,रा. भिगवन ता.इंदापूर ) या युवकाविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यानंतर सदर युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी मंगळवारी (दि.14) ऑक्टोंबर रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. यातील आरोपी युवकाला पाच वर्षाची सक्तमजुरी शिक्षा देण्यात आली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे प्रसन्न जोशी (अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील), सरकार पक्षास पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार ए.जे .कवडे तसेच सदर गुन्ह्याच्या तपासात भिगवनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एम.राठोड, पो.स.इ निश्चल शितोळे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.







