Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘दादां’ना मोठं चॅलेंज! आणखी एक शिलेदार राष्ट्रवादी सोडणार? पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 December 2025, 12:14

पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे आहेत. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. बेलदरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी जाहीर केली असून, यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

 

या वादाचे मुख्य कारण प्रभाग क्रमांक 38 (बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज) मधील जागांचे समीकरण मानले जात आहे. या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे आणि प्रकाश कदम असे तीन दिग्गज नेते एकाच पक्षातून इच्छुक आहेत. मात्र, नव्या प्रभाग रचनेनुसार येथे पुरुष उमेदवारांसाठी जागा मर्यादित झाल्या आहेत. या तिघांपैकी कोणा एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने युवराज बेलदरे यांनी बंड करणार असल्याचे चिन्हे आहेत. 

बेलदरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, त्यांचे अजित पवार यांच्यावर वैयक्तिक प्रेम आहे आणि ते त्यांचे केवळ कार्यकर्ते नव्हते, तरीही आज त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. ‘मला आणि माझ्या आंबेगावला कमी लेखणाऱ्यांना आता वेळ उत्तर देईल’, अशा शब्दांत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीतही अजित पवार यांच्याच एका कार्यकर्त्याने, निलेश इंगुले यांनी अपक्ष लढून विजय मिळवला होता. आता पुण्यातही तोच ‘बारामती पॅटर्न’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील या राजकीय भूकंपामुळे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. युवराज बेलदरे यांनी जर अपक्ष किंवा इतर पक्षातून निवडणूक लढवली, तर त्याचा थेट फटका अजित पवार गटाला बसू शकतो. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post
Indapur Crime: In Indapur taluka, a husband brutally murdered his wife; the motive is unclear, and the accused is absconding.

Indapur Crime: इंदापूर तालुक्यात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; कारण अस्पष्ट, आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.