Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगारावर पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, हडपसरपर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 August 2026, 14:43

लोणी काळभोर, ता. ४ : लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगारावर लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (ता. ३) छापा टाकला आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्सअॅपवर मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडे, ऑनलाइन पैशांच्या देवाण-घेवाणीचे संदेश आणि क्यूआर कोडद्वारे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हडपसरपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी आणखी एका संशयिताचा शोध सुरू केला आहे.

स्वप्नील शांतराम भालेराव (वय 29, रा, लोणी काळाभोर ता. हवेली, जि. पुणे) व मयूर गोपीचंद बडदे (वय २४, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस हवालदार कोल्हे आणि इतर कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना बौद्धवस्ती परिसरात एका व्यक्तीकडून मोबाईलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी छापा टाकला. पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत स्वप्नील भालेराव हा मोबाईलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ स्वीकारताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो जुगाराची माहिती मयूर बडदे याच्याकडे पाठवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मयूर बडदे याच्याकडे चौकशी केली असता, तो मिळालेली माहिती पुढे सूरज कांजणे (रा. हडपसर) याला मोबाईलद्वारे पाठवत असल्याची माहिती उघड झाली.

दोन्ही आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्सअॅपवर मटक्याच्या चिठ्ठ्यांचे फोटो, आकडे, ऑनलाइन पैशांच्या व्यवहाराचे संदेश तसेच स्कॅनर (क्यूआर कोड) द्वारे पैसे स्वीकारल्याचे पुरावे आढळून आले. यावरून ऑनलाइन माध्यमातून ‘कल्याण मटका’ जुगाराचे जाळे चालविले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडील मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू केला असून, हडपसर येथील संशयितासह या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणीच्या खात्यात किती पैसे येणार? 1500 की 3000… आज सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

Tuesday, 4 August 2026, 15:54

राज्य मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय जाहीर! पिंपरी-चिंचवडसह ‘या’ शहरांमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना

Tuesday, 4 August 2026, 15:38

रक्षकच बनले भक्षक! दरोड्याचा कट रचणारे दोन्ही पोलीस आरोपी फरार; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Tuesday, 4 August 2026, 15:13

लोणी काळभोरमध्ये गांजा विक्रेत्यावर मध्यरात्री धाड; ४७ ग्रॅम गांजासह आरोपी जेरबंद

Tuesday, 4 August 2026, 14:54

लोणी काळभोरमध्ये ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगारावर पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, हडपसरपर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे

Tuesday, 4 August 2026, 14:43

पुणेकरांच्या खिशाला मोठा फटका! रिक्षाच्या किमान भाड्यात थेट वाढ; १ सप्टेंबरपासून मोजावे लागणार ‘इतके’ रुपये…

Tuesday, 4 August 2026, 14:34
Next Post

लोणी काळभोरमध्ये गांजा विक्रेत्यावर मध्यरात्री धाड; ४७ ग्रॅम गांजासह आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.