Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॅगेत काहीच सापडलं नाही, पण बुटांनी फोडलं बिंग; पुणे विमानतळावर सोल कापताच अधिकारीही चक्रावले

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 29 October 2026, 10:11

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या तपासणीत अंमलीपदार्थ तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाने स्पोर्ट्स शूजच्या सोलमध्ये हशिश लपवून आणल्याचे तपासात आढळले. या कारवाईत 389.27 ग्रॅम हशिश जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे 13 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाशुल्क अधिकाऱ्यांना याबाबत आधीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-291 या विमानाने आलेल्या प्रवाशावर लक्ष ठेवण्यात आले. विमानतळावर आल्यानंतर त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये सुरुवातीला कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

त्यानंतर अधिकाऱ्यांचे लक्ष प्रवाशाने घातलेल्या काळ्या स्पोर्ट्स शूजकडे गेले. बुटांचे वजन आणि सोलची जाडी नेहमीपेक्षा वेगळी वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. बुटांचे सोल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये विशेष कप्पे तयार केल्याचे दिसून आले. या कप्प्यांमध्ये छोटी पॅकेट्स लपवण्यात आली होती.

पुढील तपासणीदरम्यान या पॅकेट्समध्ये हशिश हा अंमलीपदार्थ असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून संबंधित प्रवाशाला अटक केली.

या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला 7 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंमलीपदार्थ विमानतळापर्यंत कसे आणण्यात आले आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे. बुटांच्या सोलमध्ये अंमलीपदार्थ लपवण्याच्या या पद्धतीमुळे विमानतळावरील सुरक्षा तपासणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बॅगेत काहीच सापडलं नाही, पण बुटांनी फोडलं बिंग; पुणे विमानतळावर सोल कापताच अधिकारीही चक्रावले

Thursday, 29 October 2026, 10:11

पुण्यात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

Thursday, 29 October 2026, 9:23

Pune News: आधी बेपत्ता, नंतर नदीपात्रात आढळला मृतदेह! नंदिनीच्या मृत्यूमागचं गूढ कायम

Thursday, 29 October 2026, 9:13

बुधवार पेठेत पोलिसांचा छापा; 6 बांगलादेशी महिलांसह दलाल ताब्यात

Thursday, 29 October 2026, 9:05

संसार 20 वर्षांचा अन् पतीच्या आयुष्यात ‘ती’ची एंट्री! पुण्यात पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी दिली सुपारी

Thursday, 29 October 2026, 8:55

विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकलं? पहा यादी

Thursday, 29 October 2026, 8:29
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp