Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 November 2026, 13:45

कोल्हापूर : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी शाळांना दिल्या जाणाऱ्या 25 टक्के प्रवेशप्रतिपूर्ती अनुदानाच्या वितरणात कथित आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना निलंबित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. 3 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला.

शेंडकर यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सध्या त्या पुण्यातील शिक्षण आयुक्तालयात कार्यरत आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कार्यकाळात प्रशासकीय कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या निलंबनाच्या कारवाईनंतर जुन्या तक्रारींचाही विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची भरपाई सरकारकडून संबंधित शाळांना अनुदानाच्या माध्यमातून केली जाते. मात्र, 2022-23 आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षांत पात्रतेपेक्षा जास्त अनुदान दिल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात निधी वितरणातील दिरंगाई आणि आर्थिक अनियमिततेचे मुद्देही समोर आले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 (1) (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत शेंडकर निलंबित राहतील. या काळात त्यांचे मुख्यालय पुण्यातील शिक्षण आयुक्तालयात असेल. शासनाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच खासगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील त्यांच्या कामकाजावर यापूर्वी लोकप्रतिनिधींनीही प्रश्न उपस्थित केले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे आरोपही जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आले होते. आता आरटीई अनुदान प्रकरणातील निलंबनामुळे शिक्षण विभागातील कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! क्रिमीलेअर ठरवताना केवळ पालकांचे वेतन ग्राह्य धरणार नाही

Friday, 6 November 2026, 14:56

बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट!

Friday, 6 November 2026, 14:54

MPSC च्या परीक्षार्थींना वयोमर्यादेत वर्षभराची सवलत!गट-क च्या पदसंख्येत 16 हजारांहून अधिक वाढ करण्याची शिफारस; 12 लाख उमेदवारांच्या आशा पल्लवित

Friday, 6 November 2026, 14:40

पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का! १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत

Friday, 6 November 2026, 14:35

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 6 November 2026, 13:58

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

Friday, 6 November 2026, 13:45
Next Post

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp