Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: पोलीसात तक्रार का दिली, तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, थेऊर येथे जुन्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; पाच जखमी तर तिघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 November 2025, 14:39

लोणी काळभोर, ता. 23: तु काल आमच्या विरुध्द पोलीसात तक्रार का दिली, तुम्हाला आम्ही आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जुन्या वादाचा राग मनात धरून एका कुटुंबाला लोखंडी गज, लोखंडी हत्यार व दगडाने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील चव्हाण वस्ती परिसरात शनिवारी (ता. 22) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले आहे तर लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलीस ठाण्यात 3 जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आयनाबाई दिलीप चव्हाण (वय 55) त्यांचे पती दिलीप चव्हाण, मुलगा शेखर चव्हाण, सून पुजा चव्हाण व मुलगी उज्ज्वला सावंत अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अरुण छबू चव्हाण, पुनम राजू धांदे व अर्जुन अरूण चव्हाण (सर्व रा.चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयनाबाई चव्हाण व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या दोन्ही कुटुंबामध्ये प्रेमविवाह झाल्यामुळे काही दिवसांपासून वादविवाद सुरु होते. याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार फिली आहे. परंतु, काही दिवसांनी त्या दोन्ही कुटुंबीयात आपापसात वाद मिटले होते. दरम्यान, शुक्रवारी (ता.21) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आशा चव्हाण फिर्यादी यांच्या कुटुंबाला जुन्या भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करत होत्या. आयनाबाई चव्हाण यांनी थेऊर पोलीस चौकीत अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद केला होता.

शनिवारी (ता.22) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरूण छबू चव्हाण, पुनम राजू धांदे व अर्जुन अरुण चव्हाण हे फिर्यादी आयनाबाई चव्हाण यांच्या घरी आले. त्यावेळी अरूण चव्हाण यांच्या हातामध्ये लोखंडी गज होता. तर अर्जुन चव्हाण यांच्या हातामध्ये लोखंडी हत्यार व पुनम धांदे यांच्य्ह्या हातामध्ये दगड होते. अरूण चव्हाण फिर्यादी यांना म्हणाला, म्हातारे तु काल झाल्यावर व बायको विरुध्द पोलीसात तक्रार का दिली, तुम्हाला आम्ही आता सोडणार नाही, असे म्हणून आरोपींनी आयनाबाई चव्हाण यांच्या कुटुंबाला मारहाण केली.

दिलीप चव्हाण यांना डाव्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी पुजा चव्हाण गेल्या असता त्यांना अर्जुन चव्हाण याने हातातील लोखंडी हत्याराने उजव्या व डाव्या हातावर, पायावर लोखंडी हत्याराने मारहाण केली. पुनम धांदे हिने दगडाने आयनाबाई चव्हाण, शेखर चव्हाण व उज्ज्वला सावंत यांना मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी मिळून आयनाबाई चव्हाण यांच्या कुटुंबाला  हाताने व लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. व जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तिघे तिथून निघून गेले.

या मारहाणीत आयनाबाई चव्हाण, शेखर चव्हाण, उज्ज्वला सांवत यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दिलीप चव्हाण व पुजा चव्हाण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयनाबाई दिलीप चव्हाण (वय 55, रा.चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 118(2), 115 (2), 351(2)(3) 3(5), भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (2) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post
Gauri Palave Suicide: Big update in Gauri Palave suicide case..! Extramarital affairs, abortion, etc.., 'that' woman..; Damania's shocking revelation

Gauri Palave Suicide: मोठी अपडेट..! विवाह बाह्य संबंध, गर्भपात, अन्.., 'ती' बाई..; दमानिया यांचा धक्कादायक खुलासा 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.